नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प रद्द झाल्यानंतर नाणारवासीय  राज ठाकरे यांच्या भेटीला, आंब्याची पेटी देऊन मानले आभार
Nanar Locals Meet Raj Thackeray (Photo Credits: Twitter)

रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील नाणार प्रकल्प (Nanar Refinery Project) स्थानिकांच्या प्रखर विरोधानंतर अखेर मागे घेणयात आला आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई(Subhash Desai) यांनी काही दिवसांपूर्वी याबबातची घोषणा केली. सरकारच्या या निर्णयाने सुखावलेल्या नाणारवासीयांनी नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे(Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  यांची भेट घेऊन आभार मानले. राज ठाकरेंनी यापूर्वीच या प्रकल्पाला विरोध केला होता. हा प्रकल्प होऊ देणार नाही असे कोकणदौर्‍यावर असताना त्यांनी सांगितले होते. अखेर हे चित्र वास्तवात उतरल्यानंतर नाणारवासीयदेखील कृष्णकुंजवर भेटायला आले. तुमच्यामुळे लढ्याला यश आलं, आमच्या आमराई वाचल्या असे ते म्हणाले. नाणारवासियांनी राज ठाकरेंना आंब्याच्या पेट्या भेटीच्या स्वरूपात दिल्या. तसेच प्रकल्प रद्द झाला म्हणून 'बेसावध राहू नका' असा सल्लादेखील दिला आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांजवळ असणार्‍या राजापूर तालुक्यातील नाणार येथे तेलशुद्धीकरण प्रकल्प होणार होता. २०१५ साली या प्रकल्पाची राज्य सरकारने घोषणा केली होती. या प्रकल्पासाठी कोकणातील १५ हजार एकर जमिनी सरकारच्या ताब्यात जाणार होत्या. परिणामी सुमारे आठ हजार शेतकऱ्यांना /स्थानिकांना आपल्या जमिनी गमवाव्या लागण्याची शक्यता होती. तर या प्रकल्पासाठी तीन हजारहून अधिक कुटुंबे विस्थापित होण्याची भीती होती. त्यामुळे नाणारवसियांचा या प्रकल्पाला विरोध होता. कोकणवासीयांच्या प्रयत्नांना यश; कोकणात होणारा नाणार प्रकल्प रद्द, राज्य सरकारची घोषणा

कोकणात नाणार रद्द व्हावा यासाठी स्थानिकांच्या बाजूने शिवसेना,मनसे आणि नारायण राणे होते. तर महराष्ट्र भाजप पक्ष या प्रकल्पाच्या बाजूने उभे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाणार प्रकल्प राज्याच्या दृष्टीने हितकारी असल्याचे वाटत होते.