आम आदमी पार्टी महाराष्ट्रात लढवणार  नगरपालिका निवडणूक
Arvind Kejriwal (Photo Credit- Twitter)

दिल्ली विधानसभा निवडणूकीत (Delhi Assembly Elections 2020) आम आदमी पार्टीचा (APP) दणदणीत विजय झाला आहे. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आनंद व्यक्त केला आहे. तर येत्या 16 फेब्रुवारीला अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी आम आदमी पार्टीला दिल्लीत मिळालेल्या विजयानंतर आता महाराष्ट्रात सुद्धा आपला दबदबा वाढवू पाहत आहे. तर आप पक्षाने महाराष्ट्रात सुद्धा आगामी नगरपालिका निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आप पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी सदस्या प्रिती शर्मा यांनी अधिक माहिती दिली आहे.

प्रिती मेनन यांनी असे म्हटले आहे की, मुंबई महानगर पालिकेसह राज्यातील अन्य नगर पालिका निवडणूका सुद्धा आम आदमी पार्टी लढवणार आहेत. दिल्लीत विधानसभा निवडणूकीसाठी जो पॅटर्न वापरण्यात आला होता तोच महाराष्ट्रात सुद्धा वापर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. महाराष्ट्रातील जनतेवर विश्वास ठेवत त्यांनी आमच्या पक्षाला पाठिंबा मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे.('दिल्लीकरांनी देशद्रोही भाजपला नाकारले' दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांची प्रतिक्रिया)

आम आदमी पार्टीने दिल्ली विधानसभा निवडणूकीत 70 पैकी 62 जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपाला 8 जागांवर विजय मिळाल्याचे समाधान मानावे लागले आहे. पण पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचा या निवडणूकीत पराभव झाला आहे. तर 2013,2015 नंतर 2020 असा सलग तिसर्‍यांदा आपला दिल्लीमध्ये दणदणीत विजय मिळाला आहे त्यामुळे अरविंद केजरीवाल तिसर्‍यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणार आहेत. दिल्लीमध्ये 70 जागांसाठी 8 फेब्रुवारीला मतदान पार पडले. त्यानंतर एक्झिट पोलने देखील आपच्या बाजूने कौल दिला होता.