APMC Election Result Winners List: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजेच APMC च्या निवडणूकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. राज्यातील विधानसभेप्रमाणेच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही महाविकास आघाडीने (Maha Vikas Aaghadi) आपलं वर्चस्व ठेवलं आहे. दरम्यान 6 महसूल आणि 4 व्यापारी मतदारसंघामध्ये भाजपाला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी, कॉंग्रेस(NCP) आणि शेकाप, शिवसेना (Shiv Sena) या पक्षाचे पॅनल होते. 6 महसूल विभागांसाठी सुमारे 58 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उभे होते. शनिवारी (29 फेब्रुवारी) रोजी यासाठी झालेल्या मतदानामध्ये 93.72 टक्के मतदान झालं होतं.
विभागानुसार महसुल आणि व्यापारी विभागातील विजेत्यांची यादी
महसूल विभागातील विजयी उमेदवार
प्रवीण देशमुख ( महाविकास आघाडी) -अमरावती
माधवराव जाधव ( महाविकास आघाडी) -अमरावती
प्रभु पाटील (अपक्ष) - कोकण
राजेंद्र पाटील (महाविकास आघाडी) -कोकण
बाळासाहेब सोरस्कर ( महाविकास आघाडी) -पुणे
धनंजय वाडकर ( महाविकास आघाडी - पुणे
हुकूमचंद आमधरे (महाविकास आघाडी) -नागपूर
सुधीर कोठारी ( महाविकास आघाडी) - नागपूर
जयदत्त होळकर ( महाविकास आघाडी ) - नाशिक
अद्वैत हिरे ( अपक्ष) - नाशिक
वैजनाथ शिंदे ( महाविकास आघाडी) -औरंगाबाद
अशोक डक ( महाविकास आघाडी ) -औरंगाबाद
व्यापारी विभाग विजयी
कांदा बटाटा मार्केट : अशोक वाळुंज (महाविकास आघाडी)
भाजीपाला मार्केट : शंकर पिंगळे (अपक्ष )
दाणा मार्केट : निलेश विरा ( अपक्ष)
मसाला मार्केट : विजय भुता (अपक्ष )
माथाडी मतदार संघ : शशिकांत शिंदे ( महाविकास आघाडी)
फळ मार्केट : संजय पानसरे – बिनविरोध (महाविकास आघाडी)
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील 6 महसूल विभागात एकूण 3928 मतदारांपैकी 3878 जणांनी मतदान केले होते. या निवडणुकीत माजी सभापती बाळासाहेब सोळस्कर यांच्यासह माजी संचालक शंकर पिंगळे, अशोक वाळुंज, कीर्ती राणा यांची प्रतिष्ठा लागली होती.