Antilia Case-Mansukh Hiran Murder: एंटीलिया प्रकरणात मनसुख हिरेन हत्येसाठी 45 लाख रुपयांची सुपारी, एनआयएचा दावा
Antilia Case | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे निवासस्थान असलेल्या अँटीलिया ( Antilia Case) बाहेर जिलेटीनच्या कांड्या ठेवल्याचे प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या अशा दोन्ही प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजे एनआयए (NIA) ने नवा खुलासा केला आहे. एनआयएने मंगळवारी विशेष न्यायालयात सांगितले की या प्रकरणात मनसुख हिरेन (Mansukh Hiran Murder Case) यांची हत्या करण्यासाठी 45 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. एनआयएने न्यायालयात या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यास आणखी 30 दिवसांचा अवधी वाढवून मागितला आहे.

दरम्यान, पाठीमागील 25 फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबई येथील घराबाहेर जिलेटीनच्या कांड्या भरलेली एक एसयूव्ही मिळाली होती. त्यानंतर हिरेन यांनी दावा केला होता की, ती कार त्यांच्याकडे आगोदरपासूनच होती. दरम्यान, त्यानंतर 5 मार्च रोजी हिरेन यांचा थेट मृतदेहच आढळून आला. (हेही वाचा, Ajit Pawar, Anil Parab यांच्या CBI चौकशी मागणीचे Maharashtra BJP President Chandrakant Patil यांचे केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांना पत्र)

विशेष न्यायालयाने एनआयएला या आधी 9 जून रोजी शपथ पत्र दाखल करण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी दिला होता. एनआयएने विशेष न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणात पैसे कोणी दिले याची माहिती होणे आवश्यक आहे. एनआयएने न्यायालयाला सांगितले की, 150 साक्षिदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. एका टीमने दिल्ली येथे जाऊनही आपला जबाब नोंदवला आहे. या प्रकरणात माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे.