Bhosari Land Scam: एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी
Eknath Khadse, Mandakini Khadse (Photo Credit: Twitter)

भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी (Bhosari Land Scam) एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, मुंबई सत्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावत त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांना वैद्यकीय कारणांमुळे दिलासा देण्यात आला आहे. त्यांच्याबाबत पुढील कारवाई 21 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती मिळत आहे.

पुण्यातील भोसरी जमीन व्यवहारातील कथित घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनी अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावत त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. हे देखील वाचा- Rupali Chakankar On Amruta Fadnavis: अमृता फडणवीस या म्हणजे अर्धवट ज्ञानाचे परफेक्ट कॉम्बिनेशन; 'त्या' ट्विटवर रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया

ट्वीट-

एकनाथ खडसे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून मुंबई रुग्णालयात दाखल आहेत. एकनाथ खडसे यांना अजून काही दिवस रुग्णालयात राहावे लागणार आहे, असे सांगत त्यांच्या वकिलांनी न्यायालयात हजर राहण्यासाठी आणखी वेळ मिळावा, अशी विनंती केली. त्यावर खडसे यांची ही विनंती न्यायालयाने मान्य केली आणि या प्रकरणात पुढील सुनावणी 21 ऑक्टोबर रोजी ठेवली आहे.

दरम्यान, पुण्यातील भोसरी एमआयडी जमीन व्यवहारप्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना 5 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. याचबरोबर 8 जुलै रोजी एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. ईडीने तब्बल 9 तास एकनाथ खडसे यांची चौकशी केली होती. त्यावेळी मंदाकिनी खसडे यांनाही ईडीने समन्स बजावले होते. मात्र, त्यावेळी त्या ईडी कार्यालयात उपस्थित राहिल्या नव्हत्या.