अण्णा हजारे यांचे सातव्या दिवशी उपोषण मागे (फोटो सौजन्य-ANI)

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी गेल्या सात दिवसांपासून राळेगणसिद्धी (Ralegan Siddhi) येथे  उपोषण सुरु ठेवले होते. मात्र मंगळवारी (5 फेब्रुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राळेगणसिद्धी येथे दाखल होत अण्णांसोबत सहा तास चर्चा केली. या सहा तासांच्या चर्चेनंतर राणेगणसिद्धी येथे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन अण्णांच्या मागण्या पूर्ण करत आहोत असे सांगितले आहे.

अण्णांनी लोकपाल, लोकायुक्त नियुक्तीची मागणी, स्वामीनाथन आयोगानुसार शेतमालाला दीडपट हमीभाव मिळावा अशा मागण्यांसाठी उपोषणाला बसले होते. अखेर आज मुख्यमंत्र्यांनी अण्णांसह केलेल्या सहा तासाच्या चर्चेनंतर मागण्या पूर्ण झाल्यावर अण्णांनी सातव्या दिवशी उपोषण मागे घेतले आहे. (हेही वाचा-राज ठाकरे राळेगणसिद्धी येथे दाखल, अण्णा हजारे यांची भेट घेणार)

तर यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंग यांनी ही उपस्थिती लावली होती. पत्रकार परिषद दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकायुक्तसाठी वेगळी समिती नेमण्यात येईल, तर लोकपाल नियुक्तीची प्रक्रिया लवकरच सुरु होऊन त्यासाठी अण्णांनी सुचवलेले आणि सरकारचे सदस्य असणार अशा विविध मागण्यांवर मान्यता देत अण्णांनी अखेर उपोषण मागे घावे अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर उपोषण मागे घेतले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनानंतर पुढील कारवाई होणार असल्याचे ही मुख्यमंत्री यांनी सांगितले.

अण्णांच्या 'या' मागण्या मुख्यमंत्र्यांकडून मंजूर

-लोकपाल नियुक्तीची प्रक्रिया लवकरच सुरु होणार

-लोकायुक्तसाठी वेगळा नियम आणि समिती स्थापन करणार

-कृषीमुल्य आयोगाला स्वायतत्ता मिळणार

-समितीत अण्णांनी सुचवलेले आणि सरकारचे सदस्य असणार

-येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकपाल मसुदा मांडणार

-नाशवंत शेतमाल दरावरही समितीकडून अभ्यास केला जाणार

-संयुक्त चिकित्सक समितीची मागणी पूर्ण

-शेतमालाच्या दरासाठी नवीन समितीची स्थापना

-शेतकऱ्यांच्या मालभावाला योग्य तो हमीभाव मिळणार