संदीप पाटील यांच्यासारख्या अधिकाऱ्यांमुळे महाराष्ट्र पोलीस खात्याची प्रतिमा अत्युच्च शिखरावर
OBC Leader Anil Mahajan | File Photo

गडचिरोली जिल्ह्याचे उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांच्यासारख्या अधिकाऱ्यांमुळे महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) खात्याची प्रतिमा अत्युच्च शिखरावर पोहोचत आहे, असे उद्गार अनिल महाजन (Anil Mahajan) यांनी काढले आहेत. गडचिरोली जिल्ह्याचे उपमहानिरीक्षक संदीप पाटील (Sandeep Patil यांच्या कामगिरीबद्दल एका प्रसंगी महाजन बोलत होते. या वेळी बोलताना महाजन म्हणाले, सातारा,पुणे पोलिस आधिक्षक म्हणून अतिशय कर्तव्यदक्ष काम संदीप पाटील यांनी केले आहे. कायदा सुव्यवस्था आणि कर्मचारी या दोघांना कसे सांभाळावे हे पाटील साहेबांन कडून शिकण्यासारखे आहे.

पुढे बोलताना अनिल महाजन म्हणाले, शासकीय नोकरी म्हटली की बदली हा विषय पाचवीला पुजलेला असतोच .तो काही नवीन नाही. पण संदीप पाटील यांची पुणे ग्रामीण पोलीस आधिक्षक या पदावरून पदन्नोती झाली आहे. प्रमोशनवर त्यांना गडचिरोली येथे पाठवण्यात आले आहे. या अगोदर2014/15 या वर्षांत ही गडचिरोली येथे यांनी उत्तम सेवा बजावली आहे. गडचिरोलीला बदली झाली म्हटलं तर पोलीस खात्यातील अनेकांना अंगाला काटे येतात पण संदीप पाटील साहेबानी स्वतःहून गडचिरोली येथे प्रमोशनवर बदली ही मागून घेतली आहे. प्रामाणिक आधिकारी म्हणून आज पोलीस खात्यात त्यांची नोंद झाली आहे.

अनिल महाजन म्हणाले, महाराष्ट्र पोलीस खात्यात संदीप पाटील यांच्या सारखे कर्तव्य दक्ष अनेक आधिकारी आहेत उदा. कृष्णा प्रकाश-पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड , अशोक दुधे-पोलीस उपायुक्त नवी मुबंई, प्रमोद शेवाळे- उपायुक्त उल्हास नगर, सुनील भारद्वाज- व्हीजिलेनस चीफ फूड- एन्ड ड्रग्स वांद्रे, सचिन गोरे-अप्पर पोलीस अधिक्षक चाळीसगाव, अनिल कुंभारे-एडिशनल कमिश्नर ठाणे, विश्वास पांढरे, मुबंई, प्रदीप सावंत-सिक्युरिटी विभाग मुबंई , उपाआयुक्त निशिकांत भुजबळ औरंगाबाद, अजून असे अनेक आधिकारी आहेत. सर्वांचीच नावे घेणे शक्य नाही. राज्यातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यात या अधिकाऱ्याचा हातखंडा आहे. पोलीस खात्यातील माणुकीची दर्शन घडवणारे सामान्य नागरिकांना पोलिसांची भीती नाहीतर आदर निर्माण करणारे आहेत असेही अनिल महाजन म्हणाले.