महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पर्सनल सेक्रेटरी संजीव पालांडे आणि पीए कुंदन शिंदे यांना येत्या 1 जुलै पर्यंत ईडी कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. देशमुख यांच्यासह पालांडे आणि कुंदन शिंदे यांना कोटी रुपयांची लाच आणि जबरदस्ती पैसे वसूली केल्याप्रकरणी चौकशी केली जात आहे. देशमुख यांच्यावर असा आरोप लावण्यात आला आहे की, राज्याच्या गृहमंत्र्यांच्या रुपात त्यांच्या कार्यकाळादरम्यान देशमुख यांनी कथित रुपात वसूली केली आहे.(Anil Deshmukh यांना ED कडून समन्स; Money Laundering Case संबंधी चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश)
ईडीने संजीव पांडे आणि कुंदन शिंदे यांना शुक्रवारी रात्री मुंबई आणि नागपूर मध्ये त्यांच्या आणि देशमुख यांच्या घरावर छापेमारी केल्यानंतर अटक केली आहे. संजीव पालांडे हा अनिल देशमुख यांचा पर्सनल सेक्रेटरी आणि कुंदन शिंदे हे त्यांचे पीए आहेत. दोघांनी ईडीच्या चौकशी दरम्यान, आपल्या वकिलांची उपस्थिती असावी अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. त्यांनी अशी विनंती केली आहे की, वकिलांना चौकशीवेळी Audibale Distance किंवा Visible Range दरम्यान असण्याची परवानगी द्यावी.
याच दरम्यान, ईडीकडून अनिल देशमुख यांची सुद्धा चौकशी केली जात आहे. वसूली व्यतिरिक्त मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांचा सुद्धा अनिल देशमुख यांना सामना करावा लागत आहे. अनिल देशमुख आणि काही जणांच्या विरोधात ईडीचे प्रकरण हे सीबीआय कडून करण्यात आलेल्या सुरुवातीच्या तपासानंतर बॉम्बे हाय कोर्टाच्या आदेशानुंतर एक केस दाखल केल्यानंतर सुरु झाले होते.
कोर्टाने सीबीआयला असे म्हटले की, मुंबईतील माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह द्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 20 मार्च रोजी एक पत्र लिहिले होते. त्यामध्ये अनिल देशमुख यांच्या विरोधात वसूली केल्याप्रकरणी आरोप लावण्यात आले होते. तर अनिल देशमुख यांनी हाय कोर्टानच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते.(Anil Deshmukh यांच्यावर लादलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी ईडीने Sachin Waze यांचा नोंदवला जबाब)
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसूलीचा आरोप लावला होता. या आरोपांच्या तपासासाठी महाराष्ट्र सरकारने न्यायाधीश चांदीवाल आयोगाचे गठन केले. याच आरोपांच्या कारणास्तव अनिल देशमुख यांना गृह मंत्री पदावरुन हटवण्यात आले. या प्रकरणाची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी केली जात आहे.