Kirit Somaiya (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी 100 कोटींच्या वसुलीचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांसंदर्भात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अनिल देशमुख यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. या कारवाईमध्ये ईडीने आत्तापर्यंत अनिल देशमुख यांचे हॉटेल, कॉलेज, घर अशा सर्वच ठिकाणी छापेमारी केली आहे. यातच परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांना ईडीने समन्स बजावले आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मंगळवारी चौकशीसाठी कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. यावर भाजपच्या नेत्यांकडून ठाकरे सरकारवर निशाणा साधला जात आहे. याचपार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनीही पत्रकारपरिषद घेऊन अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे की, अनिल परब यांनी बेकादेशीर रिसॉर्ट बांधले. एवढचे नव्हेतर, स्वत:चे रिसॉर्ट असल्याचे सांगून मालमत्ता कर देखील भरला. महाविकास आघाडीतील मंत्री बेकायदेशीर काम करतात आणि मुख्यमंत्री परिवार त्यांना वाचवण्याचे पाप करतात. अनिल परब यांना बेकादेशीर बांधकामासंदर्भात आदेशही देण्यात आले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच अनिल परब यांची मंत्रिमंडळातून ताबडतोब हकालपट्टी करा, अशीही मागणी त्यांनी केली आहे. याशिवाय, अनिल देशमुख आणि अनिल परब यांना तुरुंगात जावच लागणार आहे, असेही त्यांनी बोलून दाखवले आहे. हे देखील वाचा- मंदिरं बंद ठेवण्याचे आदेश केंद्राचेच; भाजपच्या आंदोलनावर विजय वडेट्टीवार यांचे प्रत्त्युतर

किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद-

याआधी किरीट सोमय्या यांनी अनिल देशमुख यांच्यावर सुरु असलेल्या कारवाईबाबत भाष्य केले होते.“ईडीने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 100 कोटींहून अधिक कोटींची अफरातफतर आहे. अनेक बोगस कंपन्या, कोलकातामधून पैसा आला, वाझे वसुली गँगचा हिस्सा असो किंवा 2010, 2012 चा पैसा असो…अनिल देशमुख यांना हिशेब द्यावा लागणार. आता पुढे अनिल परब यांचाही नंबर लागणार आहे,” असे किरीट सोमय्या यांनी म्हटले होते.