Angarki Sankashti Chaturthi 2019: अंगारकी चतुर्थी निमित्त सिद्धीविनायक मंदिराला भेट देण्यासाठी चालविण्यात येणार चर्चगेट ते विरार विशेष रेल्वे
Siddhivinayak Temple (Photo Credits : commons.wikimedia)

अंगारकी चतुर्थी निमित्त मंगळवारी म्हणजेच 17 सप्टेंबरला सर्व गणेश भक्त प्रभादेवीच्या सिद्धीविनायक मंदिराला आर्वजून भेट देतात. आपल्या लाडक्या सिद्धीविनायका चरणी लीन होण्यासाठी सर्व भाविक आज मध्यरात्रीपासूनच दादर ला सिद्धीविनायक मंदिरात जाण्यासाठी घराबाहेर पडतील. आज मध्यरात्रीपासूनच सिद्धिविनायक मंदिराबाहेर लांबच लांब रांगा पाहायला मिळतील. उद्या कामाचा दिवस असल्याने गणेश भक्त आज मध्यरात्रीचे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जातील. अशा वेळी भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून यासाठी पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते विरार अशी विशेष रेल्वे सेवा सुरु केली आहे.

ही विशेष लोकल 16 सप्टेंबरला रात्री 1.30 मिनिटांनी चर्चगेटवरुन रवाना होईल. ही रेल्वे सर्व स्थानकांवर थांबणार असल्यामुळे चर्चगेट ते विरार दरम्यान असणा-या गणेश भक्तांना या रेल्वेचा फायदा होईल. (Angarki Chaturthi 2019: अंगारकी चतुर्थी गणेशभक्तांसाठी का असते खास; जाणून घ्या चंद्रोदय वेळ आणि पूजा विधी)

पहा ट्विट

याआधीही पश्चिम रेल्वे ने अशा प्रकारच्या सुविधा रेल्वे प्रवाशांसाठी ठेवल्या आहेत. दरवर्षी येणा-या अंगारकी साठी अनेक भाविक अगदी मनोभावे सिद्धीविनायका चरणी लीन होण्यासाठी जातात. दर दिवसा लाखो भाविक सिद्धिविनायकाचे दर्शन घेतात मात्र अंगारकी चर्तुथीला बाप्पाच्या चरणी लीन होण्यासाठी जाणा-या भाविकांची संख्या त्याहून जास्त असते. अशा वेळी त्यांच्या श्रद्धेत कोणतीही बाधा येऊ नये आणि त्यांचा प्रवास निर्विघ्न पणे पार पडावा यासाठी पश्चिम रेल्वेने ही विशेष सेवा सुरु केली आहे.