
अंगाडिया खंडणी प्रकरणातील (Angadia Extortion Case) 3 निलंबित अधिकार्यांना पुन्हा मुंबई पोलिस (Mumbai Police) दलामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. शिंदे-फडणवीस सरकार मध्ये आता या निलंबित पोलिसांची पुन्हा पोलिस दलामध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. या निलंबित अधिकार्यांमध्ये आयपीएस ऑफिसर सौरभ त्रिपाठी त्यांच्यासोबत पोलिस इंस्पेक्टर ओम वांगते, असिस्टंट पोलिस इन्सपेक्टर नितीन कदम आणि पोलिस सब इंस्पेक्टर समाधान जामदडे यांचा समावेश आहे. यांना सिटी क्राईम ब्रांच कडून अटक करण्यात आली होती. हे तिघे सध्या जामीनावर बाहेर आलेले आहेत तर त्रिपाठी मात्र केस दाखल झाल्यापासून फरार आहेत.
मागील आठवड्यात सत्र न्यायालयाच्या झालेल्या सुनावणी मध्ये त्रिपाठी यांना दुसर्यांदा जामीन नाकरण्यात आला होता. इंडियन एक्सप्रेस च्या रिपोर्ट नुसार, वांगते, कदम आणि जमदाडे यांची आता नियुक्ती मुंबई पोलिसांच्या लोकल आर्म डिपार्टमेंटच्या विविध तुकड्यांमध्ये करण्यात आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार,“वांगते हे लोकल आर्म्स II मध्ये, कदम यांना LA III मध्ये तर जमदाडे ला LA IV मध्ये पोस्टिंग देण्यात आले आहे.
मुंबई पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात LT Marg police station मध्ये त्रिपाठी यांनी अंगाडिया यांच्याकडून दरमहा 10 लाख रूपये मागितल्याचं चौकशीत उघड झाल्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त (दक्षिण) दिलीप सावंत यांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल केली होती. एलटी मार्ग पोलिसांच्या तीन अधिकार्यांनी अंगाडियांना धमकावून पैसे उकळल्याचं समोर आले होते.
एफआयआर नोंदवल्यानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे देण्यात आला. कदम आणि जमदाडे यांना 19 फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. वांगते यांना 10 मार्च रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना निलंबित करण्याचे आदेश जारी करून त्यांच्याविरोधात चौकशी सुरू केली होती. मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केल्यानंतर मे महिन्यात तिघांना जामीन मिळाला.