ती जागा असुरक्षित नव्हती ; सेल्फीवरुन उठलेल्या टीकेवर अमृता फडणवीसांचे स्पष्टीकरण
अमृता फडणवीस | आंग्रिया क्रुझ (Photo Credits: Facebook)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच काहीतरी कारणांमुळे चर्चेत असतात. आंग्रिया क्रुझच्या टोकावर जावून सेल्फी घेतल्याने त्यांना प्रचंड टीकेला सामोरं जावं लागले. अमृता यांनी सुरक्षिततेच्या सीमा ओलांडून स्वतःचा जीव धोक्यात घालून सेल्फी घेतल्याने त्यांच्यावर चहुबाजूने टीका होत होती. त्याचबरोबर त्यांचा सेल्फी घेतानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. स्वतःचा जीव धोक्यात घालून अमृता फडणवीस यांनी घेतला सेल्फी; व्हिडीओ व्हायरल

नव्या डोमेस्टिक क्रूझ टर्मिनलच्या उद्घाटन कार्यक्रमात त्यांना हा सेल्फीचा नाद आवरता आला नाही. मात्र टीका झाल्यानंतर त्यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. अमृता फडणवीस यांनी सांगितले की, "मी क्रूझच्या टोकावर बसले नव्हते. तेथे अजून दोन पायऱ्या होत्या. ताजी हवा अनुभवण्यासाठी मी तिथे गेले होते. पण मी तिथे सेल्फीही काढला. मात्र तरुणांनी जीव धोक्यात घालून सेल्फी काढू नये, असे मी त्यांना आवाहन करते. तरी देखील माझ्याकडून चूक झाल्याचे वाटत असल्यास मी त्याबद्दल माफी मागते." तसंच ती जागा असुरक्षित नसल्याचा दावाही त्यांनी केला.