Amravati Crime: बेपत्ता तरुणीचा मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडला, पोलिस तपासातून धक्कादायक माहिती पुढे
Murder | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

देशभरात श्रध्दा वालकर हत्याकांड गाजत असतांनाचं विविध गुन्हेगारीच्या धक्कादायक घटना पुढे येत आहे. सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रतून देखील थरकाप उडवणाऱ्या घटना पुढे येत आहे. राज्यभरात गुन्हेगारी प्रवृत्तीचं प्रमाण वाढलं असुन कायद्या अंतर्गत गुन्हेगारांना चाप बसवण्यासाठी कठोर पावलं उचलण्यात येत आहे. विदर्भातील अमरावती शहरातून एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. ज्या प्रकरणामुळे विदर्भ पुन्हा एकदा हादरला आहे. अमरावती शहराच्या अर्जुन नगर परिसरातील रतनदिप कॉलनीत एका तरुणीचा तिच्या स्वतच्या घरात मृतदेह आढळून आला आहे. गेले काही दिवसांपासून ही तरुणी बेपत्ता होती तरी याबात तिच्या कुटुंबियांकडून गाडगे नगर पोलिस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला होता. अश्विनी खांडेकर असे या तरुणीचे नाव असुन ही आपल्या कुटुंबियां सोबत राहत होती. तिच्या कुटुंबात तिची आई, तिचा भाऊ आणि ती असे तिघे राहत होते. आज सकाळी तिच्या घरी तिचा मामा आलेला, मामाला पाण्यातून दुर्गंधी आल्याने त्याने टाकीत बगितल्यास त्याला अश्विनीचा अतदेह दिसून आला.

 

संबंधित दुर्गटनेबाबत माहिती देताच अमरावती गुन्हा शाखेतील पोलिस घटनास्थळी दाकल झाले. पोलिसांकडून संबंधित प्रकरणाची सकोल चौकशी सुरु आहे. या प्रकरणी कुटुंबिय तसेच शेजाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे. ही दुर्घटना नेमकी हत्या आहे की आत्महत्या की अपघात याबाबत विविध संका उपस्थित करण्यात येत आहे. मृत तरुणी अश्विनी हिने अभियांत्रीकी शिक्षण पूर्ण केले असुन ती गेले काही दिवस मुंबई-दिल्ली सारख्या मोठ्या सहरात वास्तव्यास होती. (हे ही वाचा:- Mumbai Murder Case: जेवणात विष मिसळून पतीची हत्या, पत्नीसह तिच्या मित्राला अटक)

अश्विनी एकाएकी बेपत्ता का झाली या मागचं कारण कुणालाही सांगता आलं नाही. शहर पोलिस (Amravati Police) आयुक्त सुधीर हिरेमठ (Sudhir Hermath), डिसीपी पाटिल (DCP Patil), एसीपी पूनम पाटील (Poonam Patil), गुन्हे शाखा पोलीस निरिक्षक अर्जून ठोसरे (Arjun Thosar), गाडगे नगर पोलीस निरिक्षक आसाराम चोरमले या प्रकरणाची सखोल चौकशी करीत आहेत.