अमरावती जिल्ह्यतील (Amravti News) चिखदारा जवळ बस दरीत कोसळून भीषण अपघात (Bus Accident News) झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन महिला आणि एक बालक अशा तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तसेच यामध्ये तब्बल 36 प्रवाशी गंभीररित्या जखमी झाले आहेत. अमरावतीच्या चिखलदराजवळ ही अपघाताची घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेली ही बस परतवाडा सेमाडोह घटांग रस्त्यावरुन जात असताना घाटात वळणाच्या रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट दरीत कोसळली. (हेही वाचा - Ramdas Athawale Car Accident: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाहनाला अपघात, सर्वजण सुखरुप)
या भीषण अपघातात दोन महिला व एक बालक अशा तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून 36 प्रवासी गंभीर जखमी झालेत आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली. घटना ठिंकाणी प्रशासनाकडून देखील बचाव पथक पोहचले असून त्यांच्याकडून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. दुर्घटनेतील जखमींवर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
परतवाडा आगाराच्या धारणीकडे जाणाऱ्या बसचा जव्हार कुंडनजीक अपघात हा झाला आहे. होळी सणाच्या निम्मित्ताने गावाकडे परतणाऱ्या गावकऱ्यांच्या बसचा हा अपघात झाला.