महाराष्ट्र

Mumbai Shocker: मुंबईत अवघ्या 25 रुपयांसाठी तरुणाने केली मित्राची हत्या, ऑटोरिक्षाचे भाडे देण्यास दिला होता नकार

Shreya Varke

मित्राच्या हत्येच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. सैफ जाहिद अली असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. काल रात्री सैफ जाहिद अलीचे त्याच्या मित्र छक्कनन अलीसोबत एलबीएस रोड, कुर्ला येथील पॅलेस रेसिडेन्सी बारजवळ एका ऑटोचालकाला २५ रुपये भाडे देण्यावरून भांडण झाले. दोघांमधील हाणामारी इतकी वाढली की, सैफने छक्कनला जोरदार धक्का दिला.

Mumbai Weather Forecast: मुंबईत आज आभाळ ढगाळ, जाणून घ्या उद्याचे हवामान आणि AQI

अण्णासाहेब चवरे

मुंबई शहर आणि उपनगरांसाठी पुढील 24 तासांमध्ये आकाश ढगाळ राहण्याची आणि हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता (Mumbai Weather Forecast) आहे. भारतीय हवामान विभागाने हा अंदाज (IMD Weather Forecast) वर्तवला असून, आज (14ऑगस्ट) कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 33°C आणि 26°C च्या आसपास असेल, असेही म्हटले आहे.

Air India च्या AI684 गोवा- मुंबई विमानाची पक्षाला धडक; टेक ऑफ मध्ये अडथळा पण सारे प्रवासी सुरक्षित

टीम लेटेस्टली

विमान टेक ऑफ दरम्यान पक्षाला धडकल्यानंतर टेक ऑफ मध्ये अडथळा आला पण प्रवासी आणि क्रू सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Mumbai Crime: धक्कादायक! नववीत शिकणाऱ्या मुलाचा 3 वर्षीय मुलीवर बलात्कार; आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Jyoti Kadam

मुंबईतील साकीनाका परिसरात 3 वर्षीय मुलीवर बलात्काराची घटना घडली. नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Nagpur Cyber Crime: नागपूरमध्ये सायबर पोलीस असल्याचे भासवून बनावट ईमेलद्वारे राष्ट्रीयीकृत बँकांची फसवणूक, दोघांना अटक

Jyoti Kadam

बनावट ईमेल आयडीचा वापर करून राष्ट्रीयीकृत बँकांची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना नागपूर सायबर पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे.

Bigg Boss Marathi 5: बिग बॉसच्या घरात कच्चा लिंबू कोण? निक्की तांबोळी हिने सांगितले नाव

टीम लेटेस्टली

बिग बॉसच्या घरात स्पर्धक काय बोलतात हे लपून राहात नाही. त्यात एका महिला स्पर्धकासोबत निक्की तांबोळी हळूवार आवाजात बोलत होती. त्यावर मग बिग बॉसने स्वत:हूनच विचारले. निक्की घरातील कच्चा लिंबू कोण आहे. यावर मग निक्कीने आर्या हिचे नाव घेतले. इन्स्टाग्रामवर आपण हा व्हिडिओ पाहू शकता.

Vile Parle Telecom Fraud: मुंबईतील विलेपार्ले येथे दूरसंचार फसवणूक; 75 वर्षीय नागरिकाने 8 लाख रुपये गमावले

अण्णासाहेब चवरे

Vile Parle Cyber Fraud: मुंबई शहरातील विलेपार्ले (पूर्व) परिसरात राहणाऱ्या एका 75 वर्षीय व्यक्तीची चक्क 8 लाख रुपयांची दूरसंचार फसवणूक (Telecom Fraud) करण्यात आली आहे. पीडित व्यक्ती ज्येष्ठ नागरिक असून सेवानिवृत्त महिला एमटीएनएल (MTNL) सिव्हिल इंजिनीअर आहे. आरोपींनी त्याची दूरसंचार विभाग आणि गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक (Cyber Fraud) केली.

Digital Arrest Cyber Fraud Thane: ठाणे येथे सायबर घोटाळा; डिजिटल अटक करुन ज्येष्ठ नागरिकास 85 लाख रुपयांना गंडा

अण्णासाहेब चवरे

सायबर क्राईम (Cyber Fraud) प्रकाराचा बळी ठरवत आरोपीने पीडितावर अंमली पदार्थांची तस्करी केल्याचा आरोप केला. तसेच, त्याला बनावट अटक वॉरंट पाठवून डिजिटल अटक (Digital Arrest) केली. ज्यामध्ये सायबर गुन्हेगाराच्या दबावाला बळी पडत पीडिताने लाखो रुपयांची रक्कम अनोळखी बँक खात्यात हस्तांतरीत केली. ज्यामुळे त्याची फसवणूक झाली.

Advertisement

Pune Ganeshotsav 2024: विसर्जन मिरवणुकीत ‘लेझर लाईट्स' वर बंदी; मानाच्या मंडळाच्या बैठकीत पोलीस आयुक्तांचा निर्णय

Dipali Nevarekar

यंदा गणपतीचं आगमन 7 सप्टेंबरला होणार आहे तर दहा दिवसांच्या गणपतीचं विसर्जन 17 सप्टेंबरला होणार आहे.

Kalyan Shocker : शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या छळाला कंटाळून 13 वर्षीय मुलाची आत्महत्या, आरोपी शिक्षक बडतर्फ

Jyoti Kadam

शाळेत शिक्षक आणि इतर विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या छळला कंटाळून कल्याणमध्ये एका 13 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येवेळी त्याने लिहिलेली सुसाईड नोटही पोलिसांना मिळाली आहे. त्याआधारे पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

Tata Mumbai Marathon 2025 Registration Opens: 20 व्या टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेसाठी नोंदणी सुरु; तारखा आणि तपशील घ्या जाणून

अण्णासाहेब चवरे

जगप्रसिद्ध 20 व्या टाटा मुंबई मॅरेथॉन 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी सुरु (Tata Mumbai Marathon 2024 Registration Opens) झाली आहे. ही स्पर्धा 19 जानेवारी 2025 रोजी पार पडणार आहे. प्रोकॅम इंटरनॅशनलने (Procam International) आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची मंगळवारी अधिकृत घोषणा करण्यात आली.

Mumbai Hit And Run: मुंबईत वर्सोवा बीचवर हिट अँड रनची घटना, झोपलेल्या रिक्षा चालकाला चिरडलं, दोघांना अटक

Jyoti Kadam

मुंबईतील वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर हिट अँड रनची घटना घडली आहे. एका भरधाव एसयूव्ही कारने वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर झोपलेल्या दोघांना उडवलं. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Advertisement

Lung Airlifted From Raipur to Pune: अवघ्या 3 तासात रायपूरहून पुण्याला फुफ्फुस विमानाने पोहोचवले; 45 वर्षीय महिलेला मिळाले नवजीवन

Prashant Joshi

फुफ्फुस मिळताच रुग्णालयात प्रत्यारोपणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. हा अवयव रायपूर ते पुण्याला एअरलिफ्ट करण्यात आला, ज्यामध्ये रायपूर हॉस्पिटल ते रायपूर विमानतळ आणि त्यानंतर पुणे विमानतळ ते डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असा ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला.

HC on Surrogate Parents: शुक्राणू किंवा अंडी दात्याचा मुलावर कोणताही कायदेशीर अधिकार नाही; सरोगसी-IVF प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Prashant Joshi

खंडपीठाने याचिकाकर्त्याला दर आठवड्याच्या शेवटी तीन तास तिच्या जुळ्या मुलींना भेटण्याची परवानगी दिली. सरोगसीद्वारे जन्मलेल्या तिच्या मुली पती आणि तिच्या लहान बहिणीसोबत राहत असल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला आहे. या प्रकरणात महिलेची धाकटी बहीण अंडी दाता आहे.

Raksha Bandhan Special Trains: या विकेंडला रक्षाबंधननिमित्त मध्य रेल्वे मुंबई-नागपुर दरम्यान चालवणार 2 विशेष गाड्या; जाणून घ्या सविस्तर

Prashant Joshi

वाढत्या प्रवाशांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वे दीर्घ विकेंडमध्ये प्रमुख शहरांना जोडणाऱ्या 18 विशेष गाड्या चालवणार आहे. या विशेष गाड्या, 15 ते 20 ऑगस्ट दरम्यान धावतील.

Mhada Fake Website: सावधान! सायबर ठगांनी बनवली हुबेहुब म्हाडासारखीच वेबसाईट

Amol More

सायबर ठगानी ऑनलाईन जाहिरात करत ग्राहकांना आपल्या जाळ्यात ओढलं जात आहे. काही अर्जदारांनी दिलेल्या माहितीनुसार, काहीजण गोरेगावचे घर दाखवत आहेत. त्यातील एक महिला घर पाहिजे तर 6 लाख भरा असं आवाहन करत आहे.

Advertisement

Ganeshotsav 2024: जाणून घ्या कसा साजरा कराल पर्यावरणपूरक गणेशोत्सव; राज्य शासनाने जारी केल्या उपयुक्त टिप्स

टीम लेटेस्टली

प्रशासनाने शाडू अथवा मातीच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना, कृत्रिम कुंडात मुर्ती विसर्जन, मिरवणूकीत पारंपरिक वाद्यांवर भर, लोककला व शिवकालीन साहसी कलांच्या सादरीकरणातून या कलेला चालना, डॉल्बीचा मर्यादित आवाज ठेवून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

Mumbai Police: बसस्टॉपवर बाईकवरून जीवघेणा स्टंट करणाऱ्यांना तरुणांना पडले महागात; मुंबई पोलिसांनी घडवली अद्दल!

Amol More

पोलिसांच्या धाकानंतर या कृत्याची कबुलीही संबंधित तरुणाने व्हिडिओमार्फत दिली. बेस्ट बस स्टॉपच्या छतांवर धावणे, बाईक स्टंट करणे, वाहनांवर चढणे असे विविध स्टंटचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले होते.

Mumbai Traffic Rules Violations: ई-बाईकविरोधात मुंबई वाहतूक पोलिसांची विशेष कारवाई मोहीम; 1,176 उल्लंघन करणाऱ्यांकडून गोळा केला 1.63 लाख दंड

Prashant Joshi

मुंबई वाहतूक विभागाकडे वाहतूक नियमभंगाच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. असे आढळून आले आहे की, ई-बाईक रायडर्स, विशेषत: खाद्यपदार्थ आणि इतर डिलिव्हरी ॲप भागीदार, अनेकदा वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करतात,

Kirit Somaiya INS Vikrant Case: आयएनएस विक्रांत प्रकरणात किरीट सोमय्यांच्या अडचणीत वाढ, जमा केलेल्या पैशांच्या तपासाचे कोर्टाकडून नव्याने आदेश

Jyoti Kadam

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर असलेल्या आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणी सत्र न्यायालयात आज सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासावर ताशेरे ओढले. तसेच जमा केलेल्या पैशांच्या तपासाचे कोर्टाने नव्याने आदेश दिले.

Advertisement
Advertisement