HC on Surrogate Parents: शुक्राणू किंवा अंडी दात्याचा मुलावर कोणताही कायदेशीर अधिकार नाही; सरोगसी-IVF प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

खंडपीठाने याचिकाकर्त्याला दर आठवड्याच्या शेवटी तीन तास तिच्या जुळ्या मुलींना भेटण्याची परवानगी दिली. सरोगसीद्वारे जन्मलेल्या तिच्या मुली पती आणि तिच्या लहान बहिणीसोबत राहत असल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला आहे. या प्रकरणात महिलेची धाकटी बहीण अंडी दाता आहे.

HC on Surrogate Parents: शुक्राणू किंवा अंडी दात्याचा मुलावर कोणताही कायदेशीर अधिकार नाही; सरोगसी-IVF प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Bombay High Court (Photo Credit: PTI)

HC on Surrogate Parents: सरोगसीद्वारे जन्माला आलेल्या मुलांच्या पालाकांबाबत एक महत्वाचा निर्णय देत, मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, शुक्राणू किंवा अंडी दाताचा जन्मेलेल्या मुलावर कोणताही कायदेशीर अधिकार नाही आणि तो किंवा ती मुलाचे जैविक पालक असल्याचा दावा करू शकत नाही. न्यायालयाने एका 42 वर्षीय महिलेला तिच्या पाच वर्षांच्या जुळ्या मुलींना भेटण्याची परवानगी दिली. या महिलेने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकल खंडपीठासमोर सुनावणी झाली. महिलेला आपल्या मुलींना भेटण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवणारा कनिष्ठ न्यायालयाचा आदेश, योग्य विचार न करता मंजूर करण्यात आल्याचेही खंडपीठाने म्हटले.

याचिकाकर्त्याच्या पतीने दावा केला होता की, त्याची मेहुणी अंडी दाता असल्याने तिला जुळ्या मुलींचे  जैविक पालक म्हणण्याचा कायदेशीर अधिकार आहे आणि त्याच्या पत्नीचा मुलींवर कोणताही हक्क नाही. यावर खंडपीठाने स्पष्ट केले की, याचिकाकर्त्याची धाकटी बहीण जरी अंडी दाता असली तरी, तिला जुळ्या मुलींचे जैविक पालक असल्याचा दावा करण्याचा कोणताही वैध अधिकार नाही. मार्च 2021 मध्ये वैवाहिक कलहानंतर पती पत्नीला न सांगता मुलांसह दुसऱ्या फ्लॅटमध्ये राहायला गेला. त्यानंतर जुळ्या मुलींची काळजी घेण्यासाठी महिलेची बहीणही त्यांच्यासोबत त्या घरात निघून गेली. (हेही वाचा: SC on Unmarried Woman and Surrogacy: 'देशात विवाह संस्थेचे संरक्षण केले पाहिजे, पाश्चात्य देशांचे अनुकरण करता येणार नाही'; न्यायालयाने फेटाळली अविवाहित महिलेची सरोगसीची याचिका)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement