Digital Arrest Cyber Fraud Thane: ठाणे येथे सायबर घोटाळा; डिजिटल अटक करुन ज्येष्ठ नागरिकास 85 लाख रुपयांना गंडा

तसेच, त्याला बनावट अटक वॉरंट पाठवून डिजिटल अटक (Digital Arrest) केली. ज्यामध्ये सायबर गुन्हेगाराच्या दबावाला बळी पडत पीडिताने लाखो रुपयांची रक्कम अनोळखी बँक खात्यात हस्तांतरीत केली. ज्यामुळे त्याची फसवणूक झाली.

Senior Citizen Cyber Fraud | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

दक्षिण दिल्लीतील पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करुन एका तोतयाने ठाणे (Thane) येथील ज्येष्ठ नागरिकाची (Senior Citizen) तब्बल 85 लाख रुपयांची फसवणूक केली सायबर क्राईम (Cyber Fraud) प्रकाराचा बळी ठरवत आरोपीने पीडितावर अंमली पदार्थांची तस्करी केल्याचा आरोप केला. तसेच, त्याला बनावट अटक वॉरंट पाठवून डिजिटल अटक (Digital Arrest) केली. ज्यामध्ये सायबर गुन्हेगाराच्या दबावाला बळी पडत पीडिताने लाखो रुपयांची रक्कम अनोळखी बँक खात्यात हस्तांतरीत केली. ज्यामुळे त्याची फसवणूक झाली.

तक्रारदार सेवानिवृत्त व्यावसायिक

प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार सेवानिवृत्त व्यावसायिक आहे. त्यास 7 ऑगस्ट रोजी दिल्लीतील वसंत कुंज येथील कथीत पोलीस ठाण्यातून सुनील कुमार नामक व्यक्तीचा फोन आला. या व्यक्तीने तक्रारदारावर आरोप केला की, सीमाशुल्क विभागाने दिल्ली पोलिसांना तक्रारदाराने सिंगापूरला पाठवलेल्या पार्सलबद्दल माहिती दिली आहे. ज्यामध्ये 16 पासपोर्ट, 58 एटीएम कार्ड आणि 140 ग्रॅम ड्रग्ज होते. अचानक झालेल्या आरोपामुळे तक्रारदार गोंधळून गेला. दरम्यान, घोटाळेबाजाने व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल केला आणि त्याला बनावट पोलिस ओळखपत्र दाखवत आपण खरोखरच अधिकारी असल्याचेही सांगितले. दबाव टाकून त्याने तक्रारदाराचा विश्वास संपादन करत तक्रारदारावर मानवी तस्करीचा आरोप केला. परिस्थिती अधिक गंभीर दिसण्यासाठी, घोटाळेबाजाने अटक वॉरंट आणि मालमत्ता जप्तीच्या न्यायालयीन आदेशासह बनावट कागदपत्रेही त्याला पाठवली. (हेही वाचा, What is Digital Arrest? डिजिटल अटक म्हणजे काय? ती कोणाला होऊ शकते? घ्या जाणून)

डिजिटल अटक आणि फसवणूक

दरम्यान, आपली चौकशी सुरु आहे. त्यामुळे खोलीतून बाहेर पडू नका असा दबाव टाकत आरोपींनी तक्रारदारास डिजिटल अटक केली. धक्कादायक म्हणजे त्यांना कोणाशीही संपर्क साधू दिला नाही. पुढील कारवाई टाळण्यासाठी 85 लाख रुपये आरोपींनी सांगितलेल्या खात्यात वळते करण्यासही तक्रारदारास सांगण्यात आले. जे त्याने केले. आणखी विश्वास संपादन करण्यासाठी कारावाई आणि चौकशीमध्ये तुम्ही निर्दोश आढळल्यास तुमचे सर्व पैसे 48 तासाच्या आतमध्ये परत केले जातील, असे आश्वासनही देण्यात आले. दरम्यान, दुस-याच दिवशी, कोणतीही अपडेट्स न मिळाल्यानंतर, तक्रारदाराला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी आपल्या कुटुंबियांना माहिती दिली. त्यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. (हेही वाचा, Digital Arrest Scam: 'डिजिटल अटक' द्वारे डॉक्टरांना 59 रुपयांना गंडा, नोएडा येथील घटना)

निधीची आंशिक वसुली

तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरुन वर्तक नगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. तसेच, सायबर क्राईम हेल्पलाइन '1930' वर कॉल केल्यानंतर, ठाणे पोलिसांनी फसवणूक झालेल्या रकमेपैकी 6.3 लाख रुपये रोखण्यात यश मिळविले. तथापि, फसवणूक करणाऱ्यांनी केरळ, तामिळनाडू, राजस्थान आणि मध्य प्रदेशसह विविध ठिकाणांहून सुमारे 62 लाख रुपये आधीच काढून घेतले होते.