Mumbai Hit And Run: मुंबईत वर्सोवा बीचवर हिट अँड रनची घटना, झोपलेल्या रिक्षा चालकाला चिरडलं, दोघांना अटक

एका भरधाव एसयूव्ही कारने वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर झोपलेल्या दोघांना उडवलं. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Car Accident (PC - Pixabay)

Mumbai Hit And Run: मुंबईतील वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर हिट अँड रनची (Hit And Run Car) घटना पाहायला मिळाली. एका भरधाव एसयूव्ही कारने (SUV Car) वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर झोपलेल्या दोघांना उडवलं. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर, दुसरा अपघातात बचावला असून तो जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातानंतर कार चालक फरार झाला होता. मात्र, त्यानंतर सीसीटीव्हीच्या मदतीने वर्सोवा पोलिसांनी कार चालकासह त्याच्या मित्राला अटक केली आहे. गणेश यादव (वय 36) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर, निखली जावडे याच्यासह त्याचा मित्र शुभम डोंगरेला अटक करण्यात आली आहे. (हेही वाचा: Nagpur Hit And Run: नागपुरात व्हीएनआयटी रोड परिसरात हिट अँड रन, एक जण गंभीर जखमी (Watch Video))

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश यादव हा ऑटोरिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतो, तर त्याचा मित्र बबलू श्रीवास्तव हा डिलीव्हरी बॉयचं काम करतो. ते अधुनमधून वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर (Versova beach) झोपायला जात होते. सोमवारी देखील ते  वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर झोपायला गेले. तेव्हा रात्री झोपेत असताना एक भरधाव कार आली आणि त्यांना चिरडून गेली. घटनेनंतर बबलू श्रीवास्तव जागा झाला असता, त्याला शरिरावर जखमा दिसल्या.

गणेश यादव हा देखील त्याच्या बाजूला घोपला होता. त्याच्या अंगावरून कार गेली. बबलुने तातडीने गणेशला रूग्णालयात दाखल केलं होतं. परंतु पोलिसांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. घटनेनंतर कारसह दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला होता.