Mumbai Shocker: मुंबईत अवघ्या 25 रुपयांसाठी तरुणाने केली मित्राची हत्या, ऑटोरिक्षाचे भाडे देण्यास दिला होता नकार
सैफ जाहिद अली असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. काल रात्री सैफ जाहिद अलीचे त्याच्या मित्र छक्कनन अलीसोबत एलबीएस रोड, कुर्ला येथील पॅलेस रेसिडेन्सी बारजवळ एका ऑटोचालकाला २५ रुपये भाडे देण्यावरून भांडण झाले. दोघांमधील हाणामारी इतकी वाढली की, सैफने छक्कनला जोरदार धक्का दिला.
Mumbai Shocker: मित्राच्या हत्येच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. सैफ जाहिद अली असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. काल रात्री सैफ जाहिद अलीचे त्याच्या मित्र छक्कनन अलीसोबत एलबीएस रोड, कुर्ला येथील पॅलेस रेसिडेन्सी बारजवळ एका ऑटोचालकाला २५ रुपये भाडे देण्यावरून भांडण झाले. दोघांमधील हाणामारी इतकी वाढली की, सैफने छक्कनला जोरदार धक्का दिला. त्यामुळे छक्कन रस्त्यावर पडूनत्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छक्कनच्या डोक्याला दुखापत झाल्यानंतर तो पॅलेस रेसिडेन्सीच्या बारबाहेर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या छक्कनला पोलिसांनी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हे देखील वाचा: Mumbai Weather Forecast: मुंबईत आज आभाळ ढगाळ, जाणून घ्या उद्याचे हवामान आणि AQI
छक्कन अलीच्या हत्येनंतर जाहिद अलीला अटकेच्या भीतीने यूपीतील त्याच्या गावी पळून जायचे होते. मात्र रेल्वेत चढत असताना पोलिसांनी त्याला कल्याण येथून अटक केली. पोलिसांच्या चौकशीत त्याने दोघांमध्ये भांडण का झाले याबाबत सर्व काही सांगितले.
दोघेही यूपीचे रहिवासी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही यूपीचे रहिवासी आहेत. अली नुकताच त्याच्या गावावरून परतला होता आणि धारावीत एका कपड्याच्या कारखान्यात काम करत होता. घटनेच्या रात्री दोघेही काही कामानिमित्त कुर्ल्याला आले होते. जिथे ऑटोच्या भाड्यावरून झालेल्या भांडणात छक्कनला जीव गमवावा लागला. हे दोघेही अंमली पदार्थांचे व्यसनी असल्याची चर्चा आहे. घटनेच्या दिवशी दोघेही दारूच्या नशेत होते.