Vile Parle Telecom Fraud: मुंबईतील विलेपार्ले येथे दूरसंचार फसवणूक; 75 वर्षीय नागरिकाने 8 लाख रुपये गमावले
पीडित व्यक्ती ज्येष्ठ नागरिक असून सेवानिवृत्त महिला एमटीएनएल (MTNL) सिव्हिल इंजिनीअर आहे. आरोपींनी त्याची दूरसंचार विभाग आणि गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक (Cyber Fraud) केली.
Vile Parle : मुंबई शहरातील विलेपार्ले (पूर्व) परिसरात राहणाऱ्या एका 75 वर्षीय व्यक्तीची चक्क 8 लाख रुपयांची दूरसंचार फसवणूक (Telecom Fraud) करण्यात आली आहे. पीडित व्यक्ती ज्येष्ठ नागरिक असून सेवानिवृत्त महिला एमटीएनएल (MTNL) सिव्हिल इंजिनीअर आहे. आरोपींनी त्याची दूरसंचार विभाग आणि गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक (Cyber Fraud) केली. बीके अनिल असे या व्यक्तीचे नाव आहे. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, त्यास 10 ऑगस्ट रोजी "दूरसंचार विभागाचे अधिकारी" असल्याचा दावा करणारा एक फोन आला. कॉलरने आरोप केला की, अनिलच्या आधार तपशीलांचा वापर करून खरेदी केलेल्या सिम कार्डचा वापर अयोग्य संदेश पाठवण्यासाठी केला गेला आहे. ज्यामुळे इंटरनेट सेवा निलंबित करण्यात आली आहे.
राज कुंद्रा यांच्या नावाने दबाव
असवणूक करणाऱ्या व्यक्तीन अनिल यास फोनलाईनवरुन कथीत “अंधेरी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याशी” जोडले. ज्याने निर्माता राज कुंद्राच्या निवासस्थानी छापेमारी दरम्यान अनिलचे आधार तपशील सापडल्याचा खोटा दावा केला. घोटाळेबाज आरोपीने इशारा दिली की या प्रकरणात अनिलला अटक होऊ शकते. कारण त्याचे आधार कार्ड बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी वापरण्यात आलेले बँक खाते उघडण्यासाठी वापरले गेले होते. (हेही वाचा, Digital Arrest Cyber Fraud Thane: ठाणे येथे सायबर घोटाळा; डिजिटल अटक करुन ज्येष्ठ नागरिकास 85 लाख रुपयांना गंडा)
अटक वॉरंट जारी केल्याची धमकी
11 ऑगस्ट रोजी अनिलला आणखी एक कॉल आला. यावेळी एका व्यक्तीने दावा केला की तो "सर्वोच्च न्यायालयाच्या मनी-लाँडरिंग विभागाचा" अधिकारी आहे. कॉलरने त्याला खोटी माहिती दिली आणि सांगितले की, अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे आणि त्याला अजमीनपात्र गुन्ह्याखाली 10 दिवसांसाठी ताब्यात घेण्यात येईल. घोटाळेबाजाने अनिलला अटक टाळण्यासाठी मदत करण्याची ऑफर दिली, जर त्याने नियुक्त खात्यात पैसे ट्रान्सफर केले तर त्याची संभाव्य अटक टळू शकते, असेही तो म्हणाला. (हेही वाचा, What is Digital Arrest? डिजिटल अटक म्हणजे काय? ती कोणाला होऊ शकते? घ्या जाणून)
बँक खात्यावर डल्ला
सीव्हील इंजिनिअर राहिलेल्या बी के अनिल यांनी कोणत्याही स्वरुपाची खात्र न करता आरोपींच्या दबावाला बळी पडून त्यांनी सांगितलेल्या खात्यात 8 लाख रुपये जमा केले. आरोपीने ही रक्कम “सरकारी व्यवहार, भारताचे सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रीय सुरक्षा कायदा” यांच्या खात्यात हस्तांतरित होत असल्याचेही सांगितले. फसवणूक करणाऱ्यांनी त्याच्या बँकिंग आणि बचत खात्यांमध्ये अतिरिक्त पैसे जमा झाल्याचाही दावा केला. तसेच, ही रक्कम दोन तासांनी तपासण्याची सूचनाही केली.
विलेपार्ले पोलिसांत तक्रार
दरम्यान, अनिल यांनी घडल्या प्रकाराबद्दल आपल्या मुलीशी चर्चा केली. तेव्हा त्यांना कळले की, आपली फसवणूक झाली आहे. त्यांनी तत्काळ विलेपार्ले पोलिसांकडे धाव घेतली. विलेपार्ले पोलिसांचे सायबर विभाग आता या प्रकरणाचा तपास करत आहे. त्यांनी बँकेकडून पैसे कोठे हस्तांतरित केले होते ते शोधण्यासाठी बँकेला तपशीलांची विनंती केली आहे. तसेच, बँकेला पुढील कोणतेही व्यवहार अवरोधित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.