Pune Ganeshotsav 2024: विसर्जन मिरवणुकीत ‘लेझर लाईट्स' वर बंदी; मानाच्या मंडळाच्या बैठकीत पोलीस आयुक्तांचा निर्णय

यंदा गणपतीचं आगमन 7 सप्टेंबरला होणार आहे तर दहा दिवसांच्या गणपतीचं विसर्जन 17 सप्टेंबरला होणार आहे.

Pune Ganeshotsav 2024| X and Wikimedia Commons

पुण्यामधील सार्वजनिक गणेशोत्सव (Pune Ganeshotsav) पाहण्यासाठी मोठी गर्दी असते. त्याची एक मोठी परंपरा होती. पण यंदा या मिरवणूकीमध्ये गेल्या काही वर्षांपासून लेझर लाईट्स (Laser Light) मोठ्या प्रमाणात वापरले जातात. पण या लेझर लाईट्समुळे डोळ्यांना इजा पोहचत असल्याने त्यावर बंदी घालण्यात आली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune Police Commissioner Amitesh Kumar) यांनी विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईट्स वर बंदी घातल्याचं म्हटलं आहे. दरम्यान प्रकाशझोतांचा वापर केल्यास कारवाईचा इशारा अमितेश यांनी दिला आहे.

पुण्यामध्ये पोलिस मुख्यालयामध्ये सोमवारी सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आहे. पोलीस आयुक्तालयात मंगळवारी मानाच्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली.

गणेशोत्सवामध्ये लाईट्स आणि स्पीकर यांचा वापर होत असल्याने अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. गणपतीच्या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात स्पीकरचा वापर करण्यात येतो. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिवर्धकाचा वापराबाबत काही निर्देश दिले आहेत. लवकरच डीजे तंत्रज्ञांची बैठक आयोजित केली जाणार असल्याचीही माहिती अमितेश कुमार यांनी दिली आहे. पुण्याच्या गणेशोत्सवामध्ये यंदा विसर्जन मिरवणूकीमध्ये  पारंपारिक बॅन्ड, ढोल ताशा पथकं समाविष्ट करण्याचा आग्रह मानाच्या गणपती मंडळांसह प्रमुख मंडळांनी बोलून दाखविला आहे.  पण त्यांनी स्पीकर अधिक प्रमाणात वापरू नये यासाठी चिंता व्यक्त केली आहे.

पुण्यात गणपती च्या दिवसामध्ये मद्यबंदीही होणार?

गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या काळात पुणे शहरामध्ये 10 दिवस मद्य विक्रीवर बंदी घालावी अशा सूचना मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. मद्य विक्री दहा दिवस बंद ठेवण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचं अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे.  (हेही वाचा: Ganeshotsav 2024: राज्य शासनातर्फे उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा; विजेत्याला पाच लाखाचे परितोषिक, जाणून घ्या कुठे व कधी पर्यंत कराल अर्ज).

यंदा गणपतीचं आगमन 7 सप्टेंबरला होणार आहे तर दहा दिवसांच्या गणपतीचं विसर्जन 17 सप्टेंबरला होणार आहे.