Mumbai Crime: धक्कादायक! नववीत शिकणाऱ्या मुलाचा 3 वर्षीय मुलीवर बलात्कार; आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mumbai Crime: मुंबईतील साकीनाका परिसरात 3 वर्षीय मुलीवर बलात्काराची घटना घडली. नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. (हेही वाचा:Minor Girl Rape Case: अल्पवयीन मुलीवर बलात्कार, वेश्याव्यवसायासाठी दबाव; जोडप्यास 10 वर्षांचा सश्रम कारावास)
पोस्ट पहा
या घटनेत मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तिच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी POCSO अंतर्गत तक्रार दाखली केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 16 वर्षीय मुलाने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हा अल्पवयीन मुलगा नववीत शिकत आहे. पीडित मुलीचं कुटुंब साधारण 15 दिवसांपूर्वी सोलापूरमधून मुंबईत आलं आहे. पीडित मुलीची आवश्यक आरोग्य तपासणी राजवाडी हॉस्पिटलमध्ये केली जात आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.