Raksha Bandhan Special Trains: या विकेंडला रक्षाबंधननिमित्त मध्य रेल्वे मुंबई-नागपुर दरम्यान चालवणार 2 विशेष गाड्या; जाणून घ्या सविस्तर
वाढत्या प्रवाशांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वे दीर्घ विकेंडमध्ये प्रमुख शहरांना जोडणाऱ्या 18 विशेष गाड्या चालवणार आहे. या विशेष गाड्या, 15 ते 20 ऑगस्ट दरम्यान धावतील.
Raksha Bandhan Special Trains: पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधन सण लक्षात घेऊन, , एलटीटी मुंबई-नागपूर (2 सेवा), एलटीटी मुंबई-मडगाव (4 सेवा), सीएसएमटी मुंबई-कोल्हापूर (2 सेवा), पुणे-नागपूर (4 सेवा) आणि कलबुर्गी-बेंगळुरू (6 सेवा) मार्गांवर धावतील. विशेष गाड्यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसी (IRCTC) वेबसाइटवर आधीच खुले आहेत.
यातील 02139 एसी सुपरफास्ट स्पेशल एलटीटी मुंबई येथून 15.08.2024 (गुरुवार) रोजी 00.25 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 15.30 वाजता नागपूरला पोहोचेल.
02140 एसी सुपरफास्ट स्पेशल नागपूरहून 16.08.2024 (शुक्रवार) रोजी 13.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 04.10 वाजता एलटीटी मुंबईला पोहोचेल. (हेही वाचा: Jalna to Jalgaon New Railway Line Project: जालना ते जळगाव रेल्वे लाईन प्रकल्पास केंद्राची मंजूरी, भारतीय रेल्वे राबवणार नवे 8 प्रकल्प)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)