Mumbai Rains: मुंबईत दमदार पाऊस, नागरिकांना उष्णतेपासून दिलासा; आयएमडी हवामान अंदाज घ्या जाणून

मुंबईत शनिवारी 17 मे रोजी मुसळधार पावसाने हजेरी लावत नुकत्याच झालेल्या उष्णतेपासून दिलासा दिला. येत्या काही दिवसांत शहर आणि जवळपासच्या जिल्ह्यांमध्ये गडगडाटी वादळांसह आणखी पाऊस पडेल, असा अंदाज IMDने वर्तवला आहे.

Mumbai Rains: मुंबईत दमदार पाऊस, नागरिकांना उष्णतेपासून दिलासा; आयएमडी हवामान अंदाज घ्या जाणून
Mumbai Rains |(Representative Image/ANI)

Mumbai Thunderstorms Rains: आकाशात तळपता सूर्य आणि वाढलेल्या उष्णतेमुळे अंगातून वाहणाऱ्या घामाच्या धारा, यांपासून मुंबई शहरातील नागरिकांना कासीसा दिलासा मिळाला आहे. शहरात आज (शनिवार, 17 मे) मुसळधार पाऊस (Mumbai Rains) कोसळला. ज्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. परिणामी उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांची उष्णतेपासून काहीशी सुटका झाली. दरम्यान, शहरात पुढचे काही काळ पर्जन्यवृष्टी कायम राहील, असा अंदाज भारतीय हवमान विभाग (IMD Weather Forecast) अर्थात आयएमडीने (IMD) वर्तवला आहे. आयएमडीने आपल्या अंदाजात म्हटले आहे की, पुढील २४ तासांत शहर आणि त्याच्या उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

मुंबईमध्ये आकाश ढगाळ

भारतीय हवामान विभाग म्हणजेच आयएमडीने हवामान अंदाज वर्तवताना म्हटले की, मुंबईत ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे, दुपारी किंवा संध्याकाळी काही ठिकाणी वादळांसह हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 34 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेरील दृश्ये टिपली आहेत, ज्यात पहाटेच्या मुसळधार पावसामुळे रस्ते ओले असल्याचे दिसून आले आहे. (हेही वाचा, Maharashtra Weather Forecast: आयएमडीकडून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तीसगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी; उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा; जाणून घ्या हवामान अंदाज)

मुंबईचा पाऊस: बीएमसी इमारतीसमोरील दृश्य

पावसामुळे वाहतुकीवर परिणाम

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी पिवळा इशारा

आयएमडीच्या हवामान अंदाजात पुढे म्हटले आहे की, येत्या आठवड्यात शहर आणि आसपासच्या भागात अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईजवळील महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी पिवळा इशारा जारी करण्यात आला आहे, जो काही भागात वादळ आणि विजांसह मुसळधार पावसाची शक्यता दर्शवितो.

मुंबईमध्ये दमदार पाऊस

दरम्यान, मुंबई शहरात पाऊस येताच अनेक नागरिकांनी सोशल मीडियावर आनंद वर्तवला. काही उत्साही नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ, पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी म्हटले की, शहरात आलेल्या मुसळधार पावसामुळे थंडावा निर्माण केला आहे. एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरील एका वापरकर्त्याने एक फोटो पोस्ट केला. ज्यामध्ये म्हटले होते की, 'मुंबईवालो.. आगई बारीश'

मुंबईमध्ये पावसास सुरुवात

मुंबई शहरात कोसळलेल्या दमदार पावसामुळे वाहतुकीवरही परीणाम झाला. पावसाचा कालावधी तितका नसला तरी जेवढ्या वेळात तो आला त्याने मुंबईच्या वाहतुकीवर प्रभाव दाखवला. त्यामुळे सकल भागात रस्त्यांवर पाणी साचले. काही ठिकाणी वाहतुक कोंडी पाहायला मिळाली. रस्ता ओला असल्याने वाहन चालक आपली वाहने हळू हाकत असल्याने काही काळ वाहतुक मंदावल्याचेही पाहायला मिळाले. अर्थात पावसाचा प्रभाव कमी झाल्यानंतर वाहतुक हळूहळू पूर्ववत होऊ लागली.

(The above story first appeared on LatestLY on May 17, 2025 09:52 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).