भारतामध्ये वाढती कोरोना व्हायरसची (Coronavirus) भीती पाहता आता शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी शुक्रवार (13 मार्च) पासून मुंबई शहरातील काही शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळेत असलेल्या सुविधांनुसार आता ऑनलाईन क्लास (Online Class) सुरू केले जातील. तर इयत्ता 1-8 वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करून त्यांना पुढील इयत्तेमध्ये पाठवले जाईल. मात्र राज्यभर सध्या सुरू असलेले 10वी आणि 12वी चे पेपर वेळापत्रकानुसारच पार पडतील अशी माहिती देण्यात आली आहे. Coronavirus Outbreak: मुंबईतील शाळांना UNICEF यांच्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन.
रस्तुमजी इंटरनॅशनल स्कूल - दहिसर, विरार आणि ठाणे येथील शाळांनी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा रद्द केली आहे. विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील कामगिरीची सरासरी काढून त्याचा अंतिम निकाल बनवला जाईल असं सांगण्यात आले आहे. तर करोना व्हायरसची दहशत पाहता यंदा शाळेची उन्हाळी सुट्टी 13 मार्चपासून लागू करण्यात आली आहे. काही शाळांमध्ये ऑनलाईन आणि व्हर्च्युअल क्लास सुरू करण्यात आले आहेत. त्याच्याद्वारा विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल.
दरम्यान अनेक ठिकाणी विद्यार्थी आणि पालक संघटनांनी एकत्र येऊन शाळेला लवकर सुट्टी देण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान मुलांच्या सुरक्षेसाठी आता हा निर्णय घ्यावा लागत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. Covid-19: मुंबई महापालिकेने जाहीर केली कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची 12 मार्चपर्यंतची अधिकृत आकडेवारी.
मुंबई, ठाणे शहरानजीक काल कोरोनाग्रस्तांचे रूग्ण आढळले आहेत. दरम्यान मुंबई शहरात 2 तर ठाण्यात 1 रूग्ण आढळल्याने आता मुंबईकरदेखील धास्तावले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे एकूण 14 रूग्ण आहेत. सध्या त्यांच्यावर मुंबईच्या कस्तुरबा रूग्णालयात उपचार सुरू असून नागरिकांना घाबरून न जाता दक्ष राहण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.