केवळ मोबाईल (Mobile Phone) दिला नाही म्हणून मित्राच्या डोक्यात रॉड घालून त्याची हत्या केल्याची आणि मृतदेहाची परस्परच विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादयक घटना घडली आहे. अंबरनाथ (Ambernath News) येथील पालेगाव परिसरात हा प्रकार घडला. एमआयडीसी परिसरात सुरु असलेल्या इमारत बांधकामाच्या ठकाणी लालजी सहाय नावाचा एक तरुण फोनवर बोलत त्या ठिकाणी आला. या वेळी शंभू मांझी नामक व्यक्तीने लालजीकडे मोबाईल मागितला. त्याने मोबाईल नकार देताच चिडलेल्या मांझीने लालजीच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून त्याची हत्या केली.
शंभू मांझी याने डोक्यात घातलेला रॉड इतका मोठा होता की, घाव वर्मी लागल्याने लालजी सहाय याचा जाहीच मृत्यू झाला. त्याचा मृत्यू झाल्यानंतर शंभू घाबरला. त्याच्या मृतदेहाचे काय करायचे? हा प्रश्न त्याला पडला. त्यामुळे घाबरलेल्या स्थित त्याने आपले दोन मित्र मनोदीप जामु, चिल्ला यांना बोलावले. त्यांना सोबत घेऊन त्याने लालजी याचा मृतदेह उचलला आणि तो पालेगावजवळ येथील एका पाण्याने भरलेल्या डबक्यात फेकला.
पोलिसांना घटनेची माहिती कळताच पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेतला. अज्ञात व्यक्तिविरोधात शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आणि तपासास सुरुवात केली. वेगाने तपास करत पोलिसांनी तब्बल 40 संशयितांना ताब्यात घेतले. तपास जसजसा वेगाने पुढे सरकला तसतसे पोलीस निष्पन्नापर्यंत आले. त्यातून तीन आरोपींची नावे पुढे आली. ते आरोपी म्हणजे शंभू मांझी,मनोदीप जामु,चिल्ला मांझी. आरोपींची नावे निष्पन्न होता. पोलिसांनी सापळा रचला आणि त्यांना ताब्यात घेतले.
केवळ मोबाईल दिला नाही म्हणून तरुणाची हत्या केली जावी ही बाब अतिशय धक्कादायक मानली जात आहे. ज्यामुळे अंबरनाथ येथे मोठ्या प्रमाणावर खळबळ उघडली आहे. मोबाईल हा सध्या अनेकांच्या दैनंदिन जीवनात कळीचा मुद्दा ठरुल लागला आहे. लाहन मुलांतील मोबाईल पाहण्याचे प्रमाण, तरुणांमध्ये मोबाईलचे प्रचंड वाढलेले व्यसन, जोडप्यांमध्ये मोबाईलवरुन उद्भवणारे वाद, हे सर्वच सामाजिक चिंतेचा मुद्दा असल्याचे सामाजिक आभ्यासक उपस्थित करत आहेत.