गटाराच्या पाण्याने भाजी धुण्याचा प्रकार उघडकीस (Photo Credits-ABP Maza)

मुंबईत (Mumbai) काही ठिकाणी रेल्वे रुळांच्या बाजूलाच गटाराच्या पाण्यावर शेती केली जात असल्याचे प्रकार समोर आले होते. त्यानंतर आता पुन्हा गटाराच्या पाण्याने भाज्यात धूतल्या जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

अंबरनाथ (Ambarnath) येथे रेल्वेस्थानकातील नाल्याच्या बाजूला दोन व्यक्ती भाज्या धूत असल्याचे पहायला मिळाले आहे. या प्रकारचा व्हिडिओ एका व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्यानंतर तो व्हायरल करण्यात आला. त्यामुळे भाज्या धुण्याचा हा संतप्त प्रकार समोर आला आहे..याबाबत एबीपी माझा यांनी अधिक वृत्त दिले आहे. (दादर मार्केट येथे 10 रुपयांवरुन भाजी विक्रेत्याने ग्राहकावर केलेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर मनसे आक्रमक)

गटाराच्या पाण्याने भाज्या धूवून त्या नागरिकांना विकल्या जातात.अशा घाणेरड्या पद्धतीने भाज्या धुतल्या जात असल्यास त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर काय परिणाम होईल याचा सुद्धा भाजी विक्रेत्यांना विसर पडलेला दिसून येत आहे. एवढेच नाही तर रेल्वे स्थानकातील अधिकारी आणि रेल्वे पोलिसांनी सुद्धा यावर काही पावले उचलली नाही आहेत. मात्र नागरिकांनकडून अशा पद्धतीने भाज्या धुतून विकणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.