नांदेड मध्ये खलिस्तान समर्थक Sarabjit Singh Kirat ला अटक; पंजाब सीआयडी सोबत कारवाई
सरबजीत सिंह किरात | Photo Credits: Twitter/ ANI

पंजाब सीआयडी (Punjab CID) आणि नांदेड पोलिस (Nanded Police) यांच्या संयुक्त कारवाई मध्ये खलिस्तानी समर्थक सरबजीत सिंह किरात (Sarabjit Singh Kirat) ला अटक करण्यात आली आहे. नांदेड मध्ये 7 फेब्रुवारी दिवशी शिकारी घाट बाजार परिसरामध्ये ही अटक करण्यात आली आहे. ही व्यक्ती 'खलिस्तान जिंदाबाद' नावाच्या एका संघटनेची सदस्य होती अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान मीडीया रिपोर्ट्सनुसार, या संघटनेला बेल्जियम मधून आर्थिक रसद पुरवली जात होती.

दरम्यान अटकेनंतर खलिस्तानी समर्थक सरबजीतला पंजाबला नेण्यात आले आहे. तपासामध्ये समोर आलेल्या माहितीमध्ये त्याने काही हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचल्याचं देखील समोर आले आहे. सध्या सरबजीत अमृतसर मध्ये आहे. सरबजीतच्या विरूद्ध अमृतसर मध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वी सरबजीत फरार होऊन नांदेडला पळून आला होता. नांदेड मधील अटकेनंतर त्याला आश्रय देणार्‍या विरूद्ध देखील लवकरच कारवाई होणार आहे. हे देखील वाचा:  दिल्ली: 26 जानेवारीच्या लाल किल्लावरील धुडघूस प्रकरणी आरोपी पंजाबी अभिनेता Deep Sidhu ला अटक; Delhi Police Special Cell ची कारवाई.

सध्या खलिस्तान समर्थक सरबजीतची अधिक तपासणी, चौकशी सुरू आहे. काही खलिस्तान ला विरोध करणार्‍या हिंदू नेत्यांची हत्या घडवून आणण्याचा त्याचा कट होता. यापूर्वी अन्य 3 जणांना अटक करण्यात आली आहे.