Suicide | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Akola News:  अकोला (Akola) जिल्ह्यातीस अकोट परिसरात एका तरुणांने वीस दिवसांपुर्वी आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत दोन पोलीसांनी मानसिक छळ केल्या प्रकरणी तरुणाने आत्महत्या केल्याचे कुटूंबाने आरोप केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.  त्याने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. शिवराज गावंडे असं या आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. पोलीस या घटनेअंतर्गत तपासणी करत आहे.

या घटनेमुळे गावंडे कुटूंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र, गुन्ह्यात उल्लेख केलेली शिवराजची दुचाकी घटनास्थळावर नसल्याचा दावा कुटूंबियांनी केला आहे. या प्रकरणी शिवराजचा दोन पोलिसांनी मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिवराज हा काही सामाजिक, सांस्कृतिक चळवळीत देखील उपस्थित असायचा.

 

या घटनेनंतर शिवराजच्या आईने दोन्ही पोलीसांविरुध्द तक्रार नोंदवली आहे. पोलीस या घटनेअंतर्गत आरोपांसह आत्महत्येच्या कारणासह इतरही तपास करत आहे. शिवराजच्या आत्महत्येनंतर गावात मोठी शोककाल पसरली आहे. लवकरात लवकर शिवराजला योग्य न्याय मिळवून द्या अशी अपेक्षा नातेवाईकांकडून व्यक्त केली जात आहे.