
या वर्षीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला (Maharashtra) झोडपून काढले आहे. यातच अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे एका शेतकऱ्याने दूर जंगलात जाऊन आत्महत्या केली. ही घटना अकोला (Akola) शहरापासून 70 किलोमीटर दूर असलेल्या नवेगावच्या जंगलात घडली. पोलिसांना त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला असून पोलीस अधिक चौकशी करत आहे. पावसामुळे पिकाची नासाडी झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली, अशी माहिती कुटुंबियांनी दिली आहे. या घटनेमुळे संबधित शेतकऱ्याच्या कुटुंबियांवर दुखाचे डोंगर कोसळले आहे.
तुळशीराम शिंदे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव होते. यावर्षी त्यांनी सोयाबीन पिकाची लागवड केली होती. परंतु, अवकाळी पावसामुळे शिंदे यांच्या शेतीचे मोठे प्रमाणात नुकसान झाले. तुळशीराम हे 13 नोव्हेंबर पासून घरी परतले नाहीत. तुळशीराम यांच्या घरच्यांनी त्यांच्या शोध घेतला. मात्र, त्यांचा कुठेच पत्ता लागला नाही. मात्र, मंगळवारी त्यांचा मृतदेह वनधिकाऱ्यांना घनदाट जंगलात आढळला. ते जंगलात दूरपर्यंत गेले होते. त्यामुळे कोणालाही त्यांचा शोध घेता आला नव्हता अशी माहिती पोलिसांनी दिली. हे देखील वाचा- शेतकऱ्यांना दिलासा! पीक नुकसान भरपाईचा पहिला हप्ता देण्यासाठी 2 हजार 59 कोटींचा निधी वितरित; शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच होणार रक्कम जमा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वनधिकाऱ्यांना त्यांचा मृतदेह झाडाला फास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर वनधिकाऱ्यांनी पोलिसांनी या घटनेबाबत माहिती दिली. घटनास्थळी धाव घेतल्यानंतर पोलिसांना त्यांच्या मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. तसेच तुळशीराम यांनी सहा दिवसापूर्वी आत्महत्या केली, असा अंदाज स्थानिक पोलिसांनी लावला आहे.