Akash Ambani wedding: मुकेश अंबानी, नीता अंबानी यांच्याकडून पूत्र आकाश अंबानी यांची लग्नपत्रिका मुंबई सिद्धिविनायक चरणी अर्पण
Mukesh Ambani, Nita and Anant offer first invite at Siddivinayak temple

Akash Ambani Shloka Mehta wedding: रिलायन्स उद्योग समूह चेअरमन मुकेश अंबानी (Reliance Industries Group Chairman Mukesh Ambani) यांनी पत्नी नीता अंबानी (Nita Ambani) यांच्यासमवेत पूत्र आकाश अंबानी (Akash Ambani) यांच्यासमवेत आज (सोमवार, 11 फेब्रुवारी) मुंबई श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. पूत्र आकाश अंबानी यांच्या विवाहाची पत्रिका मुंबई श्री सिद्धिविनायक (Shree Siddhivinayak Ganapati, Mumbai) चरणी अर्पण करण्यासाठी अनिल अंबानी यांचा परिवार मंदिरात आला होता. या वेळी प्रसारमाध्यमांचे छायाचित्रकार आणि गणेश भक्तांसह अंबानी परिवाराच्या चाहत्यांनी मंदिर आणि मंदिराबाहेर गर्दी केली होती.

आकाश अंबानी यांचा विवाह श्लोका मेहता यांच्यासोबत होणार आहे. श्लोका या हिरा व्यापारी रसेल मेहता यांची कन्या आहे. आकाश हा अनिल अंबानी यांचा मोठा मुलगा आहे. भावी पत्नी श्लोका आणि स्वत: आकाश अंबानी हे दोघांनीही एकाच शाळेत शिक्षण घेतले आहे. प्रसिद्ध धिरुभाई अंबानी इंटरनॅल स्कूलमध्ये दोघांचे शिक्षण झाले आहे. (हेही वाचा, Akash Ambani-Shloka Mehta Wedding: 9 मार्चला रंगणार आकाश-श्लोका यांचा शाही विवाहसोहळा)

दरम्यान, गेल्याच वर्षी (12डिसेंबर) मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानी यांचा विवाह आनंद पीरामल यांच्यासोबत झाला होता. या विवाहाला जगभरातील विविद क्षेत्रातील मान्यवर आणि दिग्गज उपस्थित होते. अंबानी परिवारात परंपरा आहे की, घरात कोणाचाही विवाह होणार असला तरी, त्या विवाहाचे पहिले निमंत्रण मुंबई सिद्धीविनायकाला दिले जाते. त्यामुळेच अंबानी परीवार आकाश अंबानी यांच्याव विवाहाची लग्नपत्रिका घेऊन सिद्धिविनायक मंदिरात हजर झाला होता.