Akash Ambani-Shloka Mehta Wedding: 9 मार्चला रंगणार आकाश-श्लोका यांचा शाही विवाहसोहळा; 23-25 फेब्रुवारीला Switzerland मध्ये प्री वेडींग सेलिब्रेशनची धूम
Akash Ambani and Shloka Mehta (Photo Credits: Showsha/Facebook)

अंबानी कुंटुंबात पुन्हा एकदा लगीनघाई सुरु होणार आहे. रिलायन्स इंड्रस्टीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी याचा विवाहसोहळा लवकरच पार पडणार आहे. गेल्या वर्षी आकाश अंबानी  (Akash Ambani) आणि श्लोका मेहता (Shloka Mehta) यांचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर 9 मार्चला दोघेही विवाहबद्ध होणार आहेत.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ग्रँड वेडींग सेलिब्रेशन तीन दिवसांचे असेल. मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्पेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे हा शाही विवाहसोहळ्याला संध्याकाळी 7:30 वाजता सुरुवात होईल. तर 11 मार्चला ग्रँड रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी 23-25 फेब्रुवारीला प्री वेडींग सेलिब्रेश स्विर्झरलँड येथे होणार आहे. या सेलिब्रेशनला 500 लोक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. यात बॉलिवूड सेलिब्रेटींसह अनेक दिग्गजांचा सहभाग असेल.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अंबानींची कन्या ईशा अंबानीचा शाही विवाहसोहळा रंगला. त्यानंतर आता काहीच महिन्यात अंबानी हाऊसमध्ये पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार आहेत.

'आकाश अंबानी'ची खास ओळख

मुकेश आणि नीता अंबानी यांचा सर्वात मोठा मुलगा आकाश अंबानी. तो रिलायन्स जिओ ग्रुपमध्ये प्रमुख पदावर कार्यरत आहे. त्याने अमेरिकेतील ब्राऊन युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतले आहे. क्रिकेटची प्रचंड आवड असल्याने तो आयपीएल मधील मुंबई इंडियन्स संघाशी जोडला गेला आहे. त्याचबरोबर फुटबॉल लीग आयएसएलशी देखील संलग्न आहे. श्लोका मेहता ही त्याची बालमैत्रिण असून हिरे व्यापारी रसल मेहता यांची धाकटी कन्या आहे. श्लोकाने अमेरिकेतील प्रिंस्टन युनिव्हर्सिटीतून मानसशास्त्रात पदवी संपादन केली आहे. तसंच लंडन स्कूल ऑफ इकॉनोमिक्समधून कायद्याची मास्टर पदवीही प्राप्त केली आहे. सध्या ती रोझी ब्लू फाऊंडेशन सामाजिक आणि पर्यावरण विभागात कार्यरत आहे.