Ajit Pawar Prays At Siddhivinayak Temple (PC - X/@AjitPawarSpeaks)

Ajit Pawar Prays At Siddhivinayak Temple: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी (Maharashtra Assembly Election 2024) च्या प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात प्रार्थना केली. यावेळी अजित पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेदेखील उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात करण्यासाठी, पक्ष मजबूत करण्यासाठी आणि विकासाचा अजेंडा घेऊन लोकांपर्यंत जाण्यासाठी देवतेचा आशीर्वाद घेणे ही चांगली सुरुवात असल्याचे पवार यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.

राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी ही जनसेवा आमच्या हातून अशीच घडत राहो, यासाठी बाप्पाकडे साकडे घातले, अशी पोस्ट अजित पवार यांनी आपल्या X हँडलवरून केली असून त्यांनी सिद्धिविनायक मंदिरातील फोटोज शेअर केले आहेत. 14 जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे रॅलीचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची भविष्यातील कृती स्पष्ट केली जाईल, असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. (हेही वाचा -Ajit Pawar vs Sharad Pawar: थांबायचे की निघायचे? अजित पवार यांनी बोलावली बैठक, आमदारांमध्ये संभ्रम; 'घरवापसी'ची जोरदार चर्चा)

पहा व्हिडिओ - 

दरम्यान, यावेळी अजित पवार यांच्यासमवेत त्यांचे पुत्र पार्थ पवार, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल, आमदार अनिल पाटील, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्रालयाजवळील (राज्य सचिवालय) पक्षाच्या कार्यालयातून मंदिरापर्यंत बसने प्रवास केला. उल्लेखनीय म्हणजे, राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या तीन उमेदवारांसह एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत