Ajit Pawar | (Photo Credits-Twitter)

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणजे एक दिलखुलास व्यक्तीमत्व. आपल्या रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध. कधी कुठे काय बोलतील आणि कोणाला सुनवतील याचा नेम नाही. बारामतीतील एका कार्यक्रमात असेच काहीसे घडले. अजित पवार शालेय विद्यार्थ्यांसमोर ( School Student) भाषणासाठी उभे होते. आता शालेय विद्यार्थीच ते. अजित पवारांचे भाषण करताना ते लागले चुळबूळ करायला. यावर अजित पवार यांनी आवाज चढवून थेट मुलांना मिष्कीलपणे ओरडाच दिला. अजित पवार यांच्या या मिष्कील ओरड्याचीही प्रसारमाध्यमांनी बातमी केली.

बारामती येथील एका कार्यक्रमात हा किस्सा घडला. अजित पवार बोलत असताना विद्यार्थी गोंगाट करत होते. हे पाहून अजित पवार यांनी काहीसा आवाज चढवत म्हटले. 'अजिबात गोंगाट करायचा नाही. एकदम शांत बसायचे. एकदम पिंड्रॉप सायलेन्स. जर कोणी आवाज केला तर बाहेर काढेन. पोलिसांना सांगेन'. अजित पवार यांचा चढलेला आवाज पाहता विद्यार्थ्यांमध्ये एकच शांतता पसरली. (हेही वाचा, Supriya Sule: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान - सुप्रिया सुळे)

ट्विट

अजित पवार हे तसे रोखठोक व्यक्तीमत्व. त्यांच्या भाषणातून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांची, आमदारांची आणि पदाधीकाऱ्यांची घेतलेली हजेरी नेहमीच चर्चेचा विषय ठरते. आपल्या रोखठोक बोलण्यामुळे अजित पवार यांना अनेकदा टीकेचेही धनी व्हावे लागले. एकदा तर त्यांच्या बोलण्यामुळे त्यांच्यावर इतकी टीका झाली की, त्यांनी यशवंतराव चव्हान यांच्या पुतळ्यासमोर बसून आत्मक्लेश करुन घेतला. अपवादात्मक प्रसंग सोडले तर अजितदादा यांच्या रोखठोक बोलण्यावर त्यांचे कार्यकर्तेही फिदा असतात. त्यामुळे अजित पवार यांचे बोलणे ते गांभीर्याने घेतात. मात्र, त्या बोलण्याचा ते फारसा राग मानत नाहीत.