Air India चे ग्राउंड स्टाफ कर्मचारी संपावर, विमान उड्डाणाचं वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांचे हाल
एअर इंडिया image used for representational purpose | (Photo credits: PTI)

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साहाचं वातावरण आहे मात्र बुधवार रात्री पासून मुंबई विमानतळावर एअर इंडियाच्या ग्राउंड स्टाफने बोनस न मिळाल्याने काम बंदचा पवित्र घेतला आहे. सुमारे ४०० कर्मचारी संपामध्ये सहाभागी झाल्याने विमानतळावर गोंधळाचं वातावरण आहे. ग्राउंड स्टाफ नसल्याने चेक इन साठीही लांबच लांब रांग लागली आहे. परिणामी काही विमानाच्या उड्डाणांना उशीर होत आहे.

एअर इंडियाच्या संपामध्ये प्रामुख्याने ग्राउंड स्टाफ कर्मचारी सहभागी आहेत. हे कर्मचारी उपलब्ध नसल्याने चेक इन, प्रवाशांच्या बॅगा चढावण , उतरवणं, विमानतळावरील सफाईची कामं खोळंबली आहेत. त्यामुळे उड्डाणाच वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे.

 

Air India Air Transport Services Limited (AIATSL) आणि कर्मचाऱ्यांमधील वाद लवकरच शमून त्यातून सकारात्मक सु वर्ण मध्य काढण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. दिवाळीचा सण आणि वीकेण्डला जोडून आलेल्या सुट्ट्या यामुळे अनेकांनी शॉर्ट ट्रीप प्लॅन केल्या आहेत. मात्र सध्या एअर इंडियाच्या कर्मचाऱयांनी कामबंदचा पवित्रा घेतल्याने विमानतळावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय आणि नाहक त्रास होण्याची शक्यता आहे.