Naseem Khan | Twitter

लोकसभा निवडणूकीमध्ये यंदा एकही मुस्लिम समाजाचा उमेदवार कॉंग्रेसने न दिल्याने नाराज झालेल्या नसीम खान (Naseem Khan) यांनी तडकाफडकी प्रचाराक पदाचा राजीनामा दिला आहे. आपण प्रचार करणार नसल्याचे सांगत कॉंग्रेस नेतृत्त्वावर नाराजी बोलून दाखवली आहे. यानंतर नसीम खान यांना AIMIM कडून ऑफर आली आहे. नसीम खान यांनी याची माहिती देताना आपण AIMIM शी संपर्कात नाही तसेच त्यांची ऑफर स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

'भारताच्या स्वतंत्र्यापासून मुस्लिमांनाही समान संधी दिली जात आहे. हा केवळ माझा प्रश्न नाही. पक्षात मी मुस्लीम समाजाचा नेता आहे. जेव्हा त्यांच्याकडून मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्त्व का दिलं जात नाही? हा प्रश्न विचारला जातो तेव्हा त्यांना काय उत्तर द्यायचं हा माझ्यासमोर प्रश्न आहे. मला AIMIM कडून ऑफर आली त्यांचे मी आभारी आहे पण मी कॉंग्रेस सोबतच राहणार असल्याचे' नसीम खान म्हणाले आहेत.

नसीम खान यांची प्रतिक्रिया

इम्तियाज जलील यांचं ट्वीट

इम्तियाज जलील यांनी नसीम खान यांना मुंबई मधून निवडणूक लढण्यासाठी ऑफर दिली आहे. साहस दाखवा आणि संधीचा लाभ उठवा. असेही त्यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी मध्ये कॉंग्रेसला या निवडणूकीत योग्य जागा मिळाल्या नसल्याची खंत वर्षा गायकवाड यांनी बोलून दाखवली होती. त्यानंतर  वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबई मधून तिकीट जाहीर झाले आहे. या तिकीटानंतर नसीम यांनी त्यांची नाराजी बोलून दाखवली आहे. सांगली मध्येही कॉंग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत महाविकास आघाडी कडून शिवसेना ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील यांच्यासमोर निवडणूकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.