वारिस पठाण आणि देवेंद्र फडणवीस (Photo Credits-Twitter/ANI)

एमआयएम (AIMIM) पक्षाचे नेते वारिस पठाण (Waris Pathan) यांनी '100 कोटी जणांवर आम्ही 15 कोटी महागात पडणार' असल्याचे वादग्रस्त विधान केले आहे. त्यानंतर आता वारिस पठाण यांच्या या विधानामुळे संपात व्यक्त केला जात असून त्यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच असदुद्दीन औवेसी यांनी सुद्धा वारिस पठाण यांनी केलेल्या विधानावर त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करत टीका केली आहे. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांनी सुद्धा वारिस पठाण यांच्यावर सडकून टीका केली आहे. फडणवीस यांनी असे म्हटले आहे की, देशात 100 कोटीपेक्षा अधिक हिंदू आहेत त्यामुळेच कोणही बोलू शकत नाही आहे.

नागपूरात पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी वारिस पठाण यांनी केलेल्या विधानावर ताशेरे ओढले आहेत. पठाण यांचे वक्तव्य हे निंदनीय असून या देशात 100 कोटी पेक्षा अधिक हिंदूंची संख्या असल्याने कोणालाही बोलण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले आहे. तसेच मुस्लिम राष्ट्रामध्ये असे कोणी विधान केले असते तर काय परिणाम झाला असता असा सवाल ही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. त्यामुळे आता वारिस पठाण यांनी त्यांनी केलेल्या विधान लक्षात घ्यावे असे ही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.(वारिस पठाण यांना '100 कोटी जणांवर आम्ही 15 कोटी महागात पडणार..' वक्तव्य भोवलं, AIMIM कडून माध्यमांशी बोलण्यावर बंदी)

वारिस पठाण यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्यावर माफी मागावी असे फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच राज्य सरकारने सुद्धा पठाण यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. एवढेच नाही तर हिंदू समाजाला कोणी दुर्बल समजत असेल तर तो मुर्खपणा आहे. त्यामुळे वारिस पठाण यांच्यासारखी विधाने खपवून घेतली जाणार नाहीत असा इशारा ही फडणवीस यांनी दिला आहे.