Ahmednagar: विजेच्या धक्क्याने खेळाडू ठार; महावितरण अभियंता, TV Cable Owner सह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Power Lines Cables Tower | Representational Image (Photo Credits: Pixabay)

 

विजेचा धक्का ( Electric Shock) बसून युवा खेळाडूचा मृत्यू झाला आहे. ही घटना अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात घडली. अजिंक्य सुरेश गायकवाड (Ajinkya Suresh Gaikwad) (३०, रा. साईनगर, बुरुडगाव रस्ता, नगर) असे खेळाडूचे नाव आहे. अजिंक्यचे वडील नगरसेवक आहेत. त्यांनी या घटनेबाबत दिलेल्या तक्रारीवरु कोतवाली पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सुरुवातीला अजिंक्य याच्या मृत्यूची नोंद अकस्मात मृत्यू अशी केली होती. मात्र, तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हे दाखल करण्या आले. यात वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांना अजिंक याच्या मृत्यूस कारणीभूत धरण्यात आले आहे.

अजिंक्य गायकवाड यांच्या मृत्यूप्रकरणी श्रीगणेश केबल सर्विसच्या मालक असलेल्या वनिता अनिल बोरा तसेच या कंपनीसाठी काम करणारे त्यांचे पूत्र पीयूश अनिल बोरा, महावितरण कनिष्ठ अभियंता, बोरा यांना केबल कनेक्शन सेवा देणारे अहमदनगर येथील पुरवठादार, टीव्ही केबल पुरवठादार कंपनी, महावितरणच्या वीजवाहक खांबांवर चढणारे व विद्युत तारांचे काम करणारे कर्मचारी या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींची एकूण संख्या 6 आहे. (हेही वाचा, Nashik: विजेचा धक्का लागल्याने दोन शिवभक्तांचा दुर्देवी मृत्यू; नाशिक येथील धक्कादायक घटना)

अजिंक्यचे वडील सुरेश गायकवाड यांनी दिलेली तक्रार आणि महावितरण कार्यालयाचा अहवाल यांवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महावितरण कार्यालयाच्या अहवालात म्हटले आहे की, सुरेश गायकवाड यांना देण्यात आलेले टीव्हीचे कनेक्शन जवळपास 80 ते 90 फुटांवरुन आले होते. टीव्ही कनेक्शन केबल जिथूनआली होती तेथेच 11 केवीची विद्युत तार होती. या विजेच्या तारांवरुन टीव्ही केबलची तार आली होती. दरम्यानच्या काळात दोन्ही तारा एकमेकांना घासत राहिल्या. त्यातून टीव्ही केबलचे बाहेरील बाजूचे इन्शुलीन आवरण निकामी झाले. परिणामी विद्युत तारेतील विद्युत प्रवाह टीव्ही केबलमध्ये उतरला. त्यामुळे घरातील टीव्ही केबलला हात लावला असता अजिंक्य यास विजेचा धक्का बसला. त्यात त्याचा मृत्यू झाला. महावितरण कर्मचारी अधिकारी आणि टीव्ही केबलचे व्यवस्थापण आणि कर्मचारी यांच्या हालगर्जी आणि निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असा आरोप आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक आर. आर. शिंदे अधिक तपास करत आहेत.