हमदनगर-पुणे महामार्गावरील (Ahmednagar-Pune Highway) झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार तर 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका 14 वर्षीय मुलाचाही समावेश आहे. अहमदनगर-पुणे महामार्गावरील कामरगाव शिवारात ही दुर्दैवी घटना घडली. अपघातातील सर्वजण गुढीपाडव्यानिमित्त देवदर्शनाला गेले होते. देवदर्शनावरुन परतताना ही घटना घडली. भाविकांनी भरलेल्या पीकअपला भरधाव ट्रकने धडक दिल्याने हा अपघात (Ahmednagar-Pune Highway Accident) घडल्याचे समजते. राजेंद्र साळवे, विजय अवचिते, धीरज मोहिते, मयूर साळवे अशी मृतांची नावे आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरु केले. पोलिसांनीही घटनेबाबत कळवले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जखमींना वैद्यकीय उपचारासाठी अहमदनगर येथील रुग्णालयात दाखल केले. तसेच घटनास्थळावरुन तीन मृतदेह ताब्यात घेतले. जखमीतील एखाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
पिकअपमध्ये असलेले सर्व भाविक देवगड आणि शनिशिंगणापूरला भेट देऊन पुण्याच्या दिशेने येत होते. याच वेळी कामरगाव शिवारात भरधाव ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रकने पिकअपला धडक दिली. ज्यामुळे हा अपघात घडला.
वाचकांच्या माहितीसाठी असे की, अहमदनगर-पुणे हा राज्यातील एक प्रमुख रस्ता आहे. हा महामार्ग अहमदन आणि पुणे शहराला एकमेकांशी जोडतो. महामार्ग अंदाजे 120 किमी अंतरावर पसरलेला आहे आणि परिसरातील नागरिक आणि उद्योगांसाठी महत्वाची जीवनरेखा आहे. अहमदनगर-पुणे महामार्ग हा एक सुस्थितीत चार पदरी रस्ता म्हणून ओळखलाजातो. ज्यामध्ये आधुनिक पायाभूत सुविधा आणि विश्रांती थांबे, पेट्रोल पंप आणि टोल बूथ यासारख्या सुविधा आहेत.
दरम्यान, महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने सुरक्षिततेबाबत काही चिंता निर्माण झाल्या आहेत. तथापि, सरकारने रस्त्यावरील सुरक्षा सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत, जसे की रेलिंग जोडणे, चिन्ह सुधारणे आणि पोलिसांची गस्त वाढवणे. अशा उपाययोजना करुनही अपघाताच्या घटना घडतात हे वास्तव धक्कादायक आहे. दरम्यान, हा महामार्ग अनेक शहरे आणि खेड्यांमधून जातो, ज्यामुळे बाजारपेठ आणि इतर आर्थिक केंद्रांमध्ये प्रवेश होतो. डोंगर, दऱ्या आणि मोकळ्या ग्रामीण भागातून जाणारा हा मार्ग निसर्गरम्य सौंदर्यासाठी ओळखला जातो. अशा महामार्गावर जेव्हा अपघाताच्या घटना घडतात तेव्हा सहाजिकच रस्ता सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर येतो.