Representational Image (Photo Credits: ANI)

पत्नी आणि दोन मुलांना विषारी इंजेक्शन देऊन डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना अहमदनगर (Ahmednagar) येथील कर्जत (Karjat) तालुक्यातून समोर येत आहे. महेंद्र थोरात असे या आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरांचे नाव आहे. घटनास्थळी सुसाईड नोट सापडली असून कर्णबधीर मुलाच्या व्यंगाला कंटाळून संमतीने हा निर्णय घेत असल्याचे त्यात लिहिले आहे. तसंच आपली संपत्ती कर्णबधीर मुलांसाठी काम करणाऱ्या एखाद्या संस्थेला दान करण्याची इच्छाही त्यांनी नोटमध्ये लिहिले आहे. या घटनेमुळे नातलग, शेजारी यांच्याकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. महेंद्र, पत्नी वर्षा थोरात, मोठा मुलगा कृष्णा (16) आणि लहान मुलगा कैवल्य (7) यांचे मृतदेह आज त्यांच्या घरात आढळून आले. तिघांना औषधाचे इंजेक्शन देऊन थोरात यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, डॉ. थोरात राशीनजळच्या बारडगाव दगडी या गावाचे मूळ रहिवाशी असून त्यांनी राशीन येथे हॉस्पिटल सुरु केले होते. सुशिक्षित, सुखवस्तू कुटुंबाने घेतलेल्या हा निर्णय मनाला चटका लावणारी आहे. (Mumbai: धक्कादायक! मुंबईच्या नायर रुग्णालयात एका 26 वर्षीय डॉक्टराची आत्महत्या; कारण अस्पष्ट)

दरम्यान, अनेक उपचार करुनही कृष्णा याला ऐकू येत नव्हते. श्रवण यंत्राचाही काही उपयोग झाला नाही. त्यामुळे कृष्णा काहीसा अस्वस्थ होता. अनेक दिवसांपासून त्याला होणारा त्रास, दु:ख सहन न झाल्याने सर्वांच्या संमतीने हे पाऊल उचलत असल्याचे सुसाईट नोटमध्ये म्हटले आहे. तसंच यासाठी कोणालाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार धरु नये. हे पाऊल उचलणे चुकीचे वाटत असेल तरी नाईलाजाने ते उचलावे लागत आहे, असेही त्यात नमूद केले आहे.