अहमदनगर मध्ये स्टेट बँकेचे एटीएम ‘हॅक’ करून  चोरटयांनी मारला 19 लाखावर डल्ला
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: Money Control.com)

अहमदनगर (Ahmednagar)  येथील स्टेट बँकेच्या(State Bank ATM)  मुख्य शाखेबाहेरील एटीएमच्या प्रणालीत बिघाड करून त्यातून तब्बल 18 लाख 92 हजार रुपयांची रक्कम पळवण्यात आल्याचे समोर येत आहे. आश्चर्य म्हणजे याबाबत बँकेचे अधिकारी, एटीएम मधील सुरक्षारक्षक किंवा पैसे जमा करणाऱ्या कोणालाच तिळमात्र कल्पना नव्हती. काही दिवसांपूर्वी एटीएमच्या ऑडिटमध्ये रक्कम काढण्याचा झालेला प्रयत्न व प्रत्यक्षात काढली गेलेली रक्कम याचा ताळमेळ न जुळल्याने ही चोरी उघडकीला आली.हा प्रकार साधारण 5 एप्रिल ते 22 मे 2019 या दीड महिन्याच्या कालावधीत घडला असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे, यासोबतच यामागे कोणत्यातरी हॅकर्सच्या टोळीचा हात असू शकतो असा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा -मुथुट फायनान्स कार्यालयावर सशस्त्र दरोडा: 1 ठार दोन गंभीर जखमी, नाशिक शहरातील उंटवाडी परिसरातील घटना

कसा घडला हा मोठा घोटाळा?

ग्राहक जेव्हा एटीएममधून पैसे काढण्यास जातात, तेव्हा काही वेळेला ‘ट्रान्झ्ॉक्शन फेल्युअर’ दाखवले जातात. प्रत्यक्षात प्रक्रिया पार पडली जाते मात्र पैसे मात्र ग्राहकांना मिळालेले नसतात. या प्रक्रियेत तांत्रिक बिघाड करुन 18 लाख 19 हजार ग्राहकांच्या खात्यावरील रक्कम दीड महिन्याच्या कालावधीत अज्ञात व्यक्तींनी काढली. म्हणजे खरे ‘ट्रान्झ्ॉक्शन फेल असा’ संदेश स्क्रिनवर येतो. नंतर मात्र त्या ग्राहकांच्या खात्यातील रक्कम काढली गेलेली असते, असा हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले. SBI ग्राहकांसाठी खुशखबर; SBI ATM मधून करा फ्री अनलिमिटेड ट्रान्झॅक्शन

दरम्यान यासंदर्भात, बँकेच्या व्यवस्थापक मेधा श्याम इजेवार यांनी भिंगारच्या कँप पोलीसाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भिंगारकडे जाणाऱ्या रस्त्यातील चौकातच स्टेट बँकेची ही शाखा आहे.