Ahemdabad: व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून NRI नवऱ्याकडून बायकोकडे शरिरसुखाची मागणी, नकार दिल्याने सासरच्या मंडळींकडून मारहाण
Video Calls | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Ahemdabad:  गुजरात मधील अहमदाबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानुसार, एनआरआय (NRI) पतीला व्हिडिओच कॉलच्या माध्यमातून शरिर सुख देण्यास नकार देणाऱ्या एका महिलेला सासरच्या मंडळींनी मारहाण केली आहे. रिपोर्ट्स नुसार, गोटा परिसरातील 30 वर्षीय महिलेने या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. TOI ने दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा पती हा कॅनडात राहत असून तो तिच्याकडे व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून शरिर सुखाची मागणी करत होता. पण यासाठी तिने नकार दिला असता तिला सासरच्या मंडळींनी अत्यंत अमानुषपणे मारहाण केली आहे.

दाखल करण्यात आलेल्या FIR मध्ये महिलेने असे सांगितले की, या दोघांचे लग्न समाजातील वधूवर विवाह मंडळातून 21 ऑगस्ट 2020 रोजी झाले होते. लग्नानंतर तिचा नवरा रात्री उशिरा घरी दारुच्या नशेत येत असे. लग्न झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच त्याने दारुच्या नशेत छळ करण्यास सुरुवात केली. त्यासोबत अचानक न सांगता ऑगस्ट 2020 मध्येच तो कॅनडाला निघून गेला. तेथे गेल्यावर त्याच्याकडून तिला घाणेरडे मेसेज आणि फोनवर सेक्स चॅट करण्याची मागणी करु लागला. हे महिलेला मान्य नव्हते आणि तिने यासाठी नकार दिला.(UP Crime: उधार घेतलेले 60 रुपये परत मागितले म्हणून 13 वर्षीय मुलाने मित्राची केली हत्या)

पीडित महिलेने पुढे असे म्हटले की, मला फोनच्या कॅमेऱ्या समोर कपडे काढण्यास सांगितले जात असे. पण यासाठी नकार दिल्यास तो त्याच्या घरातील मंडळींना मला मारहाण करण्यास सांगत होता. पुढे सासरच्या मंडळींनी तिच्या कडून फोन काढून घेत त्याच्या पासून तिला दूर ठेवले. पुढे महिलेने असे म्हटले की, हुंडा म्हणून सासरची मंडळी सोने आणि पैसे मागत होते.

या सर्व प्रकाराला कंटाळून पीडित महिला आपल्या माहेरी ऑक्टोंबर 2020 मध्ये निघून गेली. तर महिलेने दाखल केलेल्या एफआयआर आता सासरच्या मंडळींसह नवऱ्याच्या विरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे.