Shivsena Geet 2019 (Photo Credits: You Tube/ Shiv Sena)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 (Maharashtra Vidhan Sabha Elections) चं मतदान आता अवघ्या 12 दिवसांवर येऊन ठेपलं आहे. 21 ऑक्टोबर दिवशी राज्यभर मतदान त्या पार्श्वभूमीवर सारेच पक्ष कामाला लागले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजपा सोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेनेही (Shiv Sena) आपली कंबर कसली आहे. काल (8 ऑक्टोबर) दिवशी शिवसेना दसरा मेळाव्यात शिवसेना गीत 2019 (Shivsena Geet 2019) लॉन्च करण्यात आलं आहे. ‘रंग राष्ट्राचा .. भगवा महाराष्ट्राचा!’ हे गाणं आता हळूहळू राज्यभर पसरायला लागलं आहे. संगीतकार , गायक अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) याने 'शिवसेना गीत 2019' रचलं असून अवधूत सोबत स्वप्नील बांदोडकरने (Swapnil Bandodkar) हे गाणं गायलं आहे. शिवसेना आता केवळ मराठी, महाराष्ट्र आणि भूमीपुत्र यांच्यापुरता मर्यादीत न ठेवता आता पक्ष व्यापक विचार करत आहे या आशयावर हे गाणं रचण्यात आलं आहे.

शिवसेना गीत 2019 लॉन्च होताच सोशल मीडियात त्याला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे. अवघ्या 24 तासांत 14 हजाराहून अधिक वेळेस हे गाणं पाहिलं गेलं आहे. त्यामुळे मूळ शिवसेना गीताप्रमाणेच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर लॉन्च करण्यात आलेलं गाणं तितकंच लोकप्रिय होईल असा विश्वास संगीतकार अवधूत गुप्ते यांनी त्यांच्या फेसबूक पोस्टमध्ये व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी तडजोड केली! पण, शिवसेना एकटी कधीही लढू शकते; उद्धव ठाकरे यांचा भाजपला इशारा

शिवसेना गीत 2019

यंदा शिवसेना पक्षाकडून आदित्य ठाकरेच्या स्वरूपात पहिला ठाकरे निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्याच्या प्रचारादरम्यान काही दिवसांपूर्वी वरळी विधानसभा मतदार संघात मराठी सोबत उर्दु, गुजराती, तेलगू भाषेत होर्डिंग़्स लावण्यात आले होते. तेव्हापासून आता शिवसेना केवळ मराठीचा हट्ट सोडत राष्ट्रावादाचा विचार करत सार्‍यांना सामावून घेत पुढे जाण्याचा विचार करतेय अशी चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे.