मुंबई: आदित्य ठाकरे यांच्या विधानसभा निवडणूक प्रचाराला सुरूवात; 'नमस्ते वरळी' पोस्टर्स मराठी सोबत उर्दु, गुजराती भाषेतही झळकले
Aaditya Thackeray (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Elections) शिवसेना - भाजपा पक्षाची महायुती जाहीर झाल्यानंतर आता दोन्ही पक्ष कामाला लागले आहेत. शिवसेनेकडून आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या मैदानात उतरणार आहे. आता त्याचे पोस्टर्स मुंबईच्या विविध भागांमध्ये दिसायला सुरूवात झाली आहे. मात्र सुरूवातीपासून भूमीपुत्रांचा आणि मराठी भाषेचा अभिमान याचा रेटा लावणार्‍या शिवसेनेने आदित्य ठाकरेच्या प्रचारासाठी मराठी सोबतच, उर्दू, गुजराती आणि दाक्षिणात्य भाषेमधील 'नमस्ते वरळी' अशा आशयाची पोस्टर लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सोशल मीडियामधून आदित्यच्या प्रचारासाठी विविध भारतीय भाषांचा वापर करण्याच्या खेळीमुळे सोशल मीडियामध्ये ट्रोलिंगदेखील सुरू झाले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना सुपूर्त केला AB Form; 3 ऑक्टोबरला भरणार वरळी मतदार संघातून उमेदवारी अर्ज

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधन ठाकरे यांचा मोलाचा वाटा होता. त्यानंतर मुंबई शहरात परप्रांतियांमुळे मराठी मुलांवर नोकरीमध्ये अन्याय होत असल्याच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी बाळा साहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली. त्यानंतर उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे देखील मराठीचा मुद्दा रेटून धरत आहेत. मात्र आता केवळ मतांचा डोळा ठेवत शिवसेनेने आदित्यच्या प्रचारासाठी मुंबईत इतर भाषांमधील पोस्टरही लावले क? अशी चर्चा रंगायला लागली आहे. शिवसेना आता देशभर विस्तार करण्याच्या भूमिकेत असून राष्ट्रवाद पुढे करताना मराठीचा मुद्दा मागे पडणार का? अशी चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे.

ANI Tweet

मागील 6 दशकांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे परिवाराचा नेहमीच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग राहिला आहे. पण ठाकरे घराण्यातील कोणत्याच व्यक्तीने निवडणूक लढली नाही. तसेच कोणतेच संविधानिक पद देखील सांभाळले नाही. पण आदित्यने विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याने तो निवडणूकीच्या मैदानात उतरणारा पहिला ठाकरे ठरला आहे.