महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर शाळा- कॉलेजेसची परीक्षा वेळापत्रकं बदलणार; मुंबई विद्यापीठ 68 परीक्षा पुढे ढकलणार
प्रतिकत्मक फोटो | (Photo credit: archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रामध्ये यंदा 21 ऑक्टोबर दिवशी विधानसभा निवडणूकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Elections)  मतदान आणि 24 ऑक्टोबर दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात शाळा- कॉलेजच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात येणार आहेत. अनेक अभ्यासक्रमांच्या तारखा आणि निवडणूकांच्या कार्यक्रमांच्या तारखा एकाच दिवशी येत असल्याने 21,22 च्या परीक्षा रद्द केल्या जाणार आहेत.  TOI च्या बातमीनुसार मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) दिलेल्या माहितीनुसार या काळात सुमारे 68 विविध परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केले जाणार आहेत. या परीक्षांचे नवं वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. यंदा कॉलेजचे लांबलेले प्रवेश परिणामी पहिल्या सत्राच्या लांबणाऱ्या परीक्षा यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षांचे नियोजन कोलमडण्याचं चित्र आहे. Maharashtra Vidhan Sabha Election 2019 Dates: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ‌तारखा जाहीर; 21 ऑक्टोबर ला एकाच टप्प्यात होणार मतदान; 24 ऑक्टोबरला मतमोजणी.

यंदा 21 ऑक्टोबरला निवडणूक मतदान, 24 ऑक्टोबरला मतदान निकाल आणि दुसर्‍याच दिवसापासून दिवाळी सुरू असल्याने अनेक शाळा, विद्यापीठांना परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. तसेच शाळांनाही या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर 19 ऑक्टोबर पर्यंत परीक्षा पूर्ण कराव्या लागणार आहेत. तर विद्यापीठाच्या TYBcom, TYBA, TYBsc च्या परीक्षा यांच्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

मुंबईमध्ये शाळांच्या दिवाळी सुट्ट्या असल्याने या काळात शालेय परीक्षांवर परिणाम होणयाची शक्यता कमी आहे. मात्र शिक्षकांचं प्रशिक्षण आणि शिक्षकांना देण्यात येणारं निवडणूकीचं काम यामुळे अनेक शिक्षकांचं प्रशिक्षण पुढे ढकलण्यात येणार आहे. तसेच इंटर्नल परिईक्षांचे वेळापत्रकदेखील कोलमडण्याची शक्यता आहे. शाळांप्रमाणेच कॉलेज, विद्यापीठांच्या दुसर्‍या सत्रात देखील कमी अवधी शिक्षकांच्या हातात असल्याने त्याचा परिणाम निकाल लावण्याच्या प्रक्रियेवर देखील होऊ शकतो.

महाराष्ट्रात सध्या अस्तित्त्वात असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर 2019 दिवशी संपणार आहे. त्यामुळे तत्पूर्वी निवडणूका आटोपण्याचं आव्हान निवडणूक आयोगासमोर आहे. त्यानुसार 2 नोव्हेंबर 2019 पर्यंत निवडणूक आयोग त्यांची प्रक्रिया पूर्ण करणार आहे.