Maharashtra Government Formation Update: महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2019 चे निकाल लागून 5 दिवस उलटले असले तरीही सत्ता स्थापनेसाठी अजूनही शिवसेना-भाजपा यांच्या मध्ये वाटाघाटी सुरू आहे. 145 हा सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा असल्याने अधिकाधिक आमदार स्वतःकडे खेचून घेत संख्याबळ वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. आज धुळे येथील साक्री विधानसभा मतदारसंघात जायंट किलर ठरलेल्या मंजुळा गावित (Manjula Tulshiram Gavit) यांनी आज आपला पाठिंवा शिवसेनेला जाहीर केला आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे संख्याबळ वाढून 62 झाले आहे. त्यामुळे 50% सत्तेत वाटा मागणार्या शिवसेने कडून भाजपावर दबाव वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र मीडीया रिपोर्ट्सनुसार भाजपा मुख्यमंत्रीपदासह महत्त्वाची पदं देण्यास तयार नाहीत. अशी चर्चा रंगली आहे. शिवसेनेची महाराष्ट्र सत्ता स्थापनेत भूमिका नरमली? ठरल्याप्रमाणे झाल्यास महायुतीचं सरकार येणार: संजय राऊत.
साक्री जिल्ह्यातील तत्कालीन आमदार डी एस अहिरे यांचा पराभव केल्याने अपक्ष आमदार मंजुळा गावित जायंट किलर ठरल्या आहेत. आज त्यांनी शिवसेनेला पाठिंब्वा देत असल्याचे पत्र शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहे. BJP च वाढलं टेंशन, आमदार बच्चू कडू सहित या 4 अपक्ष आमदारांनी दिलं शिवसेना पक्षाला समर्थन.
ANI Tweet
Mumbai: Manjula Tulshiram Gavit, Independent MLA from Sakri constituency met Shiv Sena chief Uddhav Thackeray, extending her support to the party. #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/0tNyiJj4EA
— ANI (@ANI) October 30, 2019
दरम्यान आज भाजपाने देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ पक्षनेते पदी निवड केली आहे. तर उद्या शिवसेना आमदारांची दुपारी 12 च्या सुमारास शिवसेना भवनावर बैठक होणार आहे. त्यावेळी शिवसेनेचा विधीमंडळ नेता निवडला जाणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या गळ्यात ही माळ पडण्याची शक्यता आहे. मुंबईत अनेक ठिकाणी आदित्यचे अभिनंदन करताना भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचं कौतुक करण्यात आलं आहे.