Mumbai Police Traffic Diversion: महाराष्ट्रासह आज देशभरात ईदचं सेलिब्रेशन आहे. मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधत ईद-ए-मिलाद-उन-नबी (Eid-e-Milad-un- nabi) साजरी केली जात आहे. या ईद निमित्त मुस्लीम बांधवांनी मुंबई शहरात काही मिरवणूकांचं आयोजन करण्यात आलं आहे. दक्षिण मुंबईमध्ये मिरवणुकी दरम्यान वाहनांचा सुलभ प्रवास आणि पादचारी यांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी काही मार्गांवर 10 नोव्हेंबर 2019 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून 11 नोव्हेंबर 2019 दिवशी 4 वाजेपर्यंत वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद राहतील. अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. Eid-E-Milad-Un-Nabi 2019: ‘ईद-ए-मिलाद' यंदा 10 नोव्हेंबरला; जाणून या ईदचा इतिहास, महत्त्व आणि परंपरा.
मुंबईमध्ये आज (10 नोव्हेंबर) भायखळा, नागपाडा, पायधुनी या भागामध्ये ईद निमित्त काही रस्ते बंद करून पर्यायी मार्गांनी वाहतूक व्यवस्था वळवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितली आहे. आज रविवार हा सुट्टीचा वार असल्याने रस्त्यावर तुलनेत वाहनांची वर्दळ कमी आहे. हेही वाचा - Eid-e-Milad un Nabi 2019 Wishes: ईद- ए-मिलाद- उन नबी निमित्त खास हिंदी Greetings, SMS, GIFs, Images, WhatsApp Status शेअर करून मुस्लिम बांधवांना द्या शुभेच्छा
मुंबई पोलिस ट्वीट
प्रिय मुंबईकरांनो,
ईद-ए-मिलाद-उन-नबी मिरवणुकी दरम्यान वाहनांचा सुलभ प्रवास आणि पादचारी यांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी खालील मार्ग 10 नोव्हेंबर 2019 रोजी 14:00 वाजता ते 11 नोव्हेंबर 2019 ते 04:00 पर्यंत वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद राहतील. pic.twitter.com/azNdxichgu
— Mumbai Police (@MumbaiPolice) November 10, 2019
मुस्लिम बांधव पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिवसाचा आनंद म्हणून आजचा दिवस साजरा करतात. 12 रबी उल अव्वल या दिवशी मुस्लिम धर्मियांचे पवित्रस्थळ मक्का (Makka) येथे मोहम्मद यांचा जन्म झाला होता. हा दिवस मुस्लिम समुदायाकडून मोठ्या उत्साहात ईद मिलाद उन नबी (Eid-e-Milad Un Nabi) च्या रूपात साजरा केला जातो. त्यानिमित्तच आज ठिकठिकाणी आयोजन जुलूसचं आयोजन करण्यात आलं आहे.