Representational Image (Photo Credits: alexisrbrown.com/ unsplash.com)

SSC HSC Board Results2019: सीबीएसई बोर्डाने (CBSE Board) नुकताच त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर बारावीचा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेनंतर अवघ्या 28 दिवसात सीबीएसईचा निकाल लागल्याने आता एचएससी बोर्डाच्या (HSC Results) विद्यार्थ्यांना देखील निकालाची आतुरता लागली आहे. लवकरच दहावी (SSC) आणि बारावी (HSC) विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे. शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर हा निकाल आणि त्याआधी निकालाची तारीख केली जाईल. CBSE Board 12th Result 2019: सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; cbse.nic.in पहा निकाल

सध्या देशामध्ये लोकसभा निवडणूक मतदान आणि मतमोजणीची धामधूम असल्याने त्याचा परिणाम दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालावर होणार का? अशी भीती होती. मात्र शिक्षण मंडळाने मे महिन्याच्या शेवटचा आठवडा ते जून महिन्याचा पहिल्या आठवड्यापर्यंत लावला जाईल असं सांगण्यात आले आहे. (नक्की पहा : SSC, HSC 2019 Result Date: दहावी, बारावी च्या विद्यार्थ्यांचा निकाल 10 जून पूर्वी maharesults.nic.in या शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर लागणार - MSBSHSE ची माहिती)

MSBSHSE वर SSC, HSC Board Results 2019 कुठे पहाल?

  • mahresults.nic.in
  • maharashtraeducation.com
  • results.mkcl.org
  • mahahsscboard.maharashtra.gov.in
  • mahahsscboard.in

यंदा निवडणुकीच्या कामातून शिक्षकांना वगळण्यात आल्याने शिक्षकांवरील भार कमी झाला आहे. त्यामुळे वेळेतच दहावी, बारावीचे निकाल लागणार आहे असा दिलासा विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे.