उद्या बुधवार, 5 ऑगस्ट रोजी अयोध्या (Ayodhya) येथे राममंदिरच्या (Ram Mandir) भूमिपूजनाचा (Bhoomi Pujan) कार्यक्रम पार पडणार आहे. या सोहळ्यापूर्वी सोशल मीडियावर आक्षेपार्ह, दिशाभूल आणि वादाला प्रोत्साहन देणारे संदेश पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा पुणे ग्रामीण पोलिस (Pune Rural Police) आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या राम मंदिराच्या वादावर अखेर नोव्हेंबर 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पडदा पडला आहे. त्यामुळे अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लागल्याने भूमिपूजनाचा कार्यक्रम र्निविघ्न पार पडावा, यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर भूमीपूजनाचा सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर वाद टाळण्यासाठी पुणे पोलिसांनी सोशल मीडियावर चुकीचे संदेश पसवणाऱ्यांविरोधात कारवाईचा इशारा दिला आहे. (श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने शेअर केले राम मंदिराच्या प्रस्तावित मॉडलचे खास फोटोज!)
ANI Tweet:
#Maharashtra: Pune rural police & Pimpri Chinchwad police, issue an order warning action against people circulating inflammatory, misleading and objectionable content on social media, ahead of Bhoomi Pujan ceremony of #RamMandir in Ayodhya.
— ANI (@ANI) August 4, 2020
उद्या दुपारी 12.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमीपूजनाच्या ठिकाणी पोहचण्याची शक्यता आहे. कार्यक्रमासाठी तब्बल 175 पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान कोविड-19 च्या संकटामुळे विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. राम मंदिराच्या प्रस्तावित मॉडलचे फोटोज श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने शेअर केले आहेत. दरम्यान उद्याच्या राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.