Ayodhya Ram Mandir Bhumi Pujan: महाराष्ट्रात महालक्ष्मी अंबाबाई मंदिर, काळाराम मंदिरावर अयोद्धा राम मंदिर भूमीपुजनाच्या पार्श्वभूमीवर आकर्षक रोषणाई
काळाराम मंदिर आणि कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर । Photo credits: Twitter

भारतातील तमाम हिंदू बांधव आणि प्रामुख्याने राम भक्त ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस आज उगवला आहे. आज (5 ऑगस्ट) दिवशी अयोद्धा नगरी मध्ये दुपारी साडे बाराच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम मंदीर भूमिपुजन आणि शिलान्यासाचा कार्यक्रम पार पडणार आहे. सध्या कोरोना संकटामुळे या मंगलमय दिवशी सामान्य रामभक्तांना अयोद्धेमध्ये जाणं शक्य नाही. परंतू देशभरामध्ये राम नामाचा गजर सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये कोल्हापुरचे अंबाबाई मंदिर, नाशिक पंचवटी येथील काळाराम मंदिर येथे आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. दरम्यान काळाराम मंदिरामध्ये श्रीरामाच्य प्रतिकृतीची रांगोळी देखील साकारण्यात आली आहे.

महाराष्ट्रामध्ये कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सारी प्रार्थनास्ठळं बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र काही नित्य पूजा सुरू असल्याने काही मोजकेच जण मंदिरात पुजा अर्चनासाठी आणि आजच्या मंगल दिवशी मंदिरामध्ये उपस्थित आहेत.

कोल्हापूरची अंबाबाई

अंबाबाईच्या मंडपामध्ये केळीचे खांब लावण्यात आले आहेत. सोबतच गाभर्‍या झेंडुच्या फुलांनी सजवले आहे.

नाशिक पंचवटी येथील काळाराम मंदिर

पंचवटीतील काळाराम मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिरात श्रीराम चंद्रांची चित्र रांगोळी काढण्यात आली आहे. तसेच मंदिरात महिलांनी दीप प्रज्वलन केले आहे.

नागपूरातही संघकार्यालयाबाहेर श्रीरामाची रांगोळी काढलेली आहे. दरम्यान आज अयोद्धेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्य योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, भाजपा नेत्या उमा भारती, योगगुरू रामदेव बाबा उपस्थित आहे. राजकीय मान्यवरांसोबतच अनेक दिग्गज संत महंत देखील उपस्थित आहेत.